Homeबॅक पेजहजरत ख्वाजा सूफी मजिदूल...

हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची सांगता

मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातलल्या मेहफिल-ए-जहांगिरिया दर्ग्यात हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची नुकतीच सांगता झाली. गौहर ए नायब, मलिक उल मशैख, सिराज उल औलिया, हजरत अलहज ख्वाजा सूफी मजीद उल हसन शाहसाहब रहमतुल्ला अलैह यांचा उर्स राष्ट्रात शांतीसाठी दुआ आणि ख्वाजा चीगन्शद चीगन्शक्लद यांचे प्रेमसंदेश यांचा सिलसिला सांगणारा अबुल उलया जहांगिरियाचा 12वा वार्षिक उर्स सज्जादा नशीन दर्गाह हजरत ख्वाजा सुफी डॉ. फैज उल हसन शाह मजिदी कादरी चिश्ती अबुल उलई कुदस सिरहुल अजीज यांच्या देखरेखीखाली चिश्ती सूफी परंपरेनुसार उर्सचे आयोजन परचम कुशाई, चादरपोशी आणि कुल शरीफने आयोजित केला गेला. संपूर्ण जगात हजरत ख्वाजा सुफी फैज उल हसन शाह साहिब यांच्या आश्रयाखाली अधिकृत चादरपोशी सज्जादा नशीन दर्गा येथे विशेषत: हिंदुस्थानात शांतता, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

देशभरातील सर्व सूफींच्या वतीने चादरी सादर करण्यात आल्या. महफिल-ए-सीमा आणि मुशायरा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये देशातील मान्यवर कव्वाल आणि कवींनी आपले कलाम सादर केले. जुल ए संदल काढण्यात आली आणि गुसल शरीफ महफिल ए रंग हुई आणि लंगरचे वाटप करण्यात आले. उर्सनिमित्त आयोजित सुफी संमेलनात सिलसिला-ए-चिश्तिया बुजूर्गांच्या वक्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेतील योगदानावर आपले विचार व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात इस्लामिक विद्वान हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती शफीक उल कादरी होते. चिश्ती संजारी अजमेरी बाबा गरीब नवाज रहमतुल्ला हनाफी यांनी अल्लाह ते हजरत ख्वाजा सुफी माजीद उल हसन शाह साहब रहमतुल्ला अलैही यांनी देशातील शांततेसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

खादिम ए अस्ताना हजरत सुफी मोईनुद्दीन माजिदी म्हणाले की, सिराज उल औलिया हजरत ख्वाजा सुफी माजिद उल हसन शाहसाहब रहमतुल्ला अलैही यांनी नेहमीच लोकांना प्रेमाचा संदेश दिला. त्यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व वर्ग आणि धर्माच्या लोकांना सामावून घेतले. उर्सनिमित्त सुफी खानकाह असोसिएशनच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रमात सहभागी होऊन देशात शांतता व समृद्धीसाठी प्रार्थना केली. खानकाह असोसिएशन उत्तर प्रदेश युनिटचे प्रदेशाध्यक्ष, सुफी नाझीम माजिदी, प्रदेश सचिव सुफी सलाहुद्दीन माजिदी, महाराष्ट्र प्रदेश युवा विंग अध्यक्ष, सुफी रजा सय्यद अशफाकी यांच्यासह सुफी खानकाह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

Continue reading

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...
Skip to content