Homeचिट चॅटवेटरन्स मास्टर्स नॅशनल...

वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्य

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.

३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरी गटात कांस्य, तर २०२५मध्ये झालेल्या सी. सी. आय. महाराष्ट्र राज्य स्पर्धेत महिला दुहेरी गटात रौप्यपदक मिळविले होते.

३५ वर्षांवरील महिला दुहेरी गटात पल्लवी मित्तलने वरदा दीक्षितसोबत कांस्यपदक पटकावले. पल्लवी, वरदा जोडीला उपांत्य फेरीत पुण्याच्या नुपूर व प्रबिनू जोडीकडून पराभव पत्करावा लागला. या विभागात १०० जोड्यांचा सहभाग होता. पल्लवी मित्तल यांनी कनिष्ठ गटात अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. या दोघीजणी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शहाजी राजे क्रीडा संकुलातील सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीत सुश्रुत करमरकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content