Homeन्यूज ॲट अ ग्लांसउद्यापासून रविवारपर्यंत श्री...

उद्यापासून रविवारपर्यंत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन बंद!

मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार असल्यामुळे उद्या, बुधवार, सात जानेवारीपासून रविवार, 11 जानेवारी 2026पर्यंत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. या काळात भाविकांना श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणे शक्य आहे.

येत्या सोमवारपासून म्हणजेच 12 जानेवारीपासून रोजी प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी कळविले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content