Homeडेली पल्सयेत्या बुधवारी 'सीहॉक्स'...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, ‘आयएनएएस 334’ या नावाने कार्यरत होणार आहे.

24 हेलिकॉप्टरसाठी, अमेरिकी सरकारसोबत फेब्रुवारी 2020 मध्ये एफएमएस करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्याचा ही हेलिकॉप्टर भाग आहेत. सीहॉक्सच्या समावेशाने, भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात  लक्षणीय वाढ होणार आहे. अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) म्हणजे पाणबुडी रोधी युद्ध, अँटी-सर्फेस वॉरफेअर (ASuW) म्हणजे पाण्यातून केलेले जमिनीवरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य (सर्च अँड रिलीफ-SAR), मेडिकल इव्हॅक्युएशन (MEDEVAC) म्हणजे अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांची केली जाणारी वाहतूक आणि व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट (VERTREP) म्हणजे समुद्रात जहाजांना हवाई मार्गाने केला जाणारा पुरवठा, या दृष्टीने या हेलिकॉप्टरची रचना केलेली आहे.

भारतीय  वातावरणासाठी योग्यतेच्या अनुषंगाने,या हेलिकॉप्टर्सची कसून चाचणी घेण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे साजेशी आहेत. भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजा पुरवण्याच्या दृष्टीने, आधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि हवाई इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी (एव्हियोनिक्स सूट) परिपूर्ण सीहॉक्स आदर्श ठरतात. यामुळे पारंपरिक तसेच अचानक उद्भवणाऱ्या धोक्यांसाठी वाढीव क्षमता मिळते.

एमएच 60 आर हेलिकॉप्टर्स भारताची सागरी क्षमता वाढवतील, तसेच नौदलाच्या कार्यकक्षेचा विस्तार करतील आणि सागरी क्षेत्राच्या विशाल परिघात, नौदलाच्या विविधांगी सातत्यपूर्ण कार्यवाहीला पाठबळ देतील. हिंद महासागर क्षेत्रात सीहॉकची तैनाती, भारतीय नौदलाचे सागरी अस्तित्त्व मजबूत करेल, संभाव्य धोके दूर करेल आणि या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेशात सुरक्षित आणि निर्धोक वातावरण सुनिश्चित करेल.

Continue reading

‘जीव’ आणि ‘एप्रिल मे ९९’ कान्स महोत्सवात!

फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म मार्केट' विभागासाठी 'जीव - द क्रिएचर' आणि 'एप्रिल मे ९९' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्यासपीठावर मराठी चित्रपटांची झालेली ही निवड...

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...
Skip to content