Thursday, June 13, 2024
Homeएनसर्कलभारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली...

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली.

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय प्रतिनिधीमंडळाने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाचे उपसचिव जॉर्ज मिना यांच्या नेतृत्त्वाखालील प्रतिनिधीमंडळासोबत व्यापार आणि संभाव्य गुंतवणुकीशी संबंधित विषयांवर रचनात्मक आणि फलदायी चर्चा केली. दोन्ही लोकशाही देशांमधले विद्यमान आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी, दोन्ही अर्थव्यवस्थांच्या व्यापार पूरकतेचा लाभ घेण्यासाठी आणि कौशल्य व अद्याप असलेला वाव शोधण्यासाठी सिडने आणि मेलबर्नमधल्या उद्योग कंपन्यांशीदेखील चर्चा केली.

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारांतर्गत संयुक्त समितीच्या पहिल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी ईसीटीए अर्थात आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या सुरळीत अंमलबजावणीचे महत्त्व मान्य केले. या कराराच्या अंमलबजावणीतल्या मुद्द्यांवर जसे की सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण,व्हिस्की आणि वाईनवरील  कार्यकारी गटाने नियामक आव्हाने आणि या उत्पादनांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी योजलेल्या उपाययोजना, ईसीटीए उपसमितीच्या बैठकांचे फलित आणि वेळेवर निराकरणासाठी त्यांच्या नियमित बैठकांची गरज, किनारी पर्यटनासह परस्पर हिताची क्षेत्रे, महत्त्वपूर्ण खनिजे आणि भारतातील कोळंबी, झिंगा यासाठी रोगमुक्त क्षेत्र स्थापन करण्यासाठी सहयोग, यावर चर्चा केली. संयुक्त समितीच्या बैठकीत संयुक्त समितीसाठी कार्यपद्धतीचे नियम स्वीकारण्यात आले आणि मासिक आधारावर अधिमान आयात डेटाचे  नियमित आदानप्रदान  करण्यासाठी  संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्यात आली. मुक्त व्यापार करारासाठी अशा प्रकारची ही पहिलीच यंत्रणा आहे.

संयुक्त समितीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण सेवांमधील अडचणीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यात सीमापार ई-पेमेंट्स आणि नर्सिंग आणि दंतचिकित्सासारख्या व्यवसायांमध्ये परस्पर मान्यताकरार सुलभ करण्यासाठी भारताच्या विनंतीचा विचार करण्यात आला. एकूणच, संयुक्त समितीच्या बैठकीत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील बळकट आणि परस्पर हिताचे आर्थिक संबंध वाढवण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. यामुळे दोन्ही राष्ट्रांसाठी सहकार्य आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया इंडिया बिझनेस कौन्सिल आणि सिडनी व मेलबर्नमधील चेंबर्स ऑफ कॉमर्स तसेच भारतीय उद्योग महासंघासह उद्योगकंपन्या आणि संघटनांमधल्या बैठकांमधून परस्पर हिताच्या क्षेत्रांचा शोध घेण्यात आला.

ओशनिया क्षेत्रात ऑस्ट्रेलिया भारताचा महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाणिज्यिक व्यापार 2023-24मध्ये सुमारे 24 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला असून यात आणखी वाढ होण्यासाठी मोठा वाव आहे. संयुक्त समितीची बैठक दोन्ही देशांसाठी व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यासाठी आणि सुलभ व्यापार, गुंतवणुकीला चालना तसेच तंत्रज्ञान पाठबळासह  इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय आर्थिक सहकार्यासाठी नवीन संधी शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच म्हणून भूमिका बजावते.

Continue reading

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...

परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

भारतभरातील आरोग्यसेवा क्षेत्राचा कायापालट घडवणारा क्रांतिकारी टप्पा पार करत ईझेरेक्स, या आद्य आरोग्यसेवा कंपनीने भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इम्जेनेक्स इंडियाबरोबर नुकताच एक धोरणात्मक सामंजस्य ठराव (एमओयू) केला आहे. या सहयोगामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील दोन नवोन्मेष्कारी कंपन्या एका सामाईक...
error: Content is protected !!