Homeहेल्थ इज वेल्थपरवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी ‘ईझेरेक्स’चा...

परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

भारतभरातील आरोग्यसेवा क्षेत्राचा कायापालट घडवणारा क्रांतिकारी टप्पा पार करत ईझेरेक्स, या आद्य आरोग्यसेवा कंपनीने भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इम्जेनेक्स इंडियाबरोबर नुकताच एक धोरणात्मक सामंजस्य ठराव (एमओयू) केला आहे. या सहयोगामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील दोन नवोन्मेष्कारी कंपन्या एका सामाईक उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. दर्जेदार वैद्यकीय सेवा सर्व भारतीयांना परवडण्याजोगी आणि उपलब्ध करणे हे ते सामाईक उद्दिष्ट आहे.

एआय-पॉवर्ड वैद्यकीय उपकरणांमधील ईझेरेक्सचे अजोड कौशल्य आणि अतिप्रगत जैवतंत्रज्ञानातील इम्जेनेक्सचे आघाडीचे स्थान यांचा लाभ घेत एतद्देशीय, कमी खर्चातील व परिणामकारक तपासणी व निदान तंत्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट दोन्ही सहयोगींनी ठेवले आहे. अशा प्रकारच्या या पहिल्याच सहयोगाने तांत्रिक शक्तीला हेतू प्राप्त करून दिला आहे. याद्वारे तंत्रज्ञानाचे उपयोजन प्रतिबंधात्मक उपाय व लवकर निदान यांतील तफावती दूर करण्यासाठी केले जाऊ शकेल.

ईझेरेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ प्रतिम दास महापात्रा या कराराच्या महत्त्वाबद्दल म्हणाले की,  आरोग्यसेवेतील समता व सक्षमीकरणाच्या दिशेने काम करण्यासाठी इम्जेनेक्ससोबत सहयोग करणे आमच्यासाठी आनंददायी अनुभव आहे. आमची परस्परपूरक बलस्थाने एकत्र आणून, ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांच्या सहाय्याने वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या पद्धतींना नव्याने आकार देता येईल, अशी आशा आम्हाला वाटते. त्यामुळे दर्जा, परवडण्याजोगे दर आणि आवाका या सर्वच निकषांवर नवीन मापदंड स्थापित होऊ शकतील.

ईझेरेक्सने यापूर्वी टीसीएस, इन्फोसिस फाउंडेशन आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यासारख्या आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. अर्थात इम्जेनेक्सबरोबरचा हा धोरणात्मक सहयोग आरोग्यसेवा क्षेत्रात एतद्देशीय उत्पादन व संशोधन-विकास यांच्या दिशेने प्रगती करण्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे.

Continue reading

‘जीव’ आणि ‘एप्रिल मे ९९’ कान्स महोत्सवात!

फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म मार्केट' विभागासाठी 'जीव - द क्रिएचर' आणि 'एप्रिल मे ९९' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्यासपीठावर मराठी चित्रपटांची झालेली ही निवड...

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...
Skip to content