Homeटॉप स्टोरीपंतप्रधान नरेंद्र मोदींचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फ्रान्समध्ये जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काल रात्री उशिरा फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले. पॅरिसच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदी यांची नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट झाली. मॅक्रॉन यांनी पंतप्रदान मोदी यांच्याकरीता रात्रभोजचे आयोजनही केले होते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी काल, 10 फ्रेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पॅरिसमध्ये आज मोदी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक (एआय) कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविणार आहेत. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत सर्वजण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने  वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहेत.

या दौऱ्यात मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी 2047 होरायझन रोडमॅपसंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत. या भेटीत हे दोन्ही नेते फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी मार्सेल या फ्रान्सच्या ऐतिहासिक शहरालाही भेट देणार आहोत. यासोबतच ते आंतरराष्ट्रीय उष्णसंजलन प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पालाही (International Thermonuclear Experimental Reactor project) थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर प्रकल्पालाही भेट देणार आहोत. भारत हा या प्रकल्पाच्या भागीदार देशांच्या संघाचा सदस्य आहे. याशिवाय माझरी युद्ध स्मशानभूमीला भेट देऊन पंतप्रधान मोदी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

फ्रान्सवरून मोदी जाणार अमेरिकेत

फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यावर्षी जानेवारीत ट्रम्प यांनी अमेरिकेची दुसऱ्यांदा धुरा सांभाळली. निवडणुकीतील त्यांच्या ऐतिहासिक विजयानंतर आणि नंतर शपथविधीनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याच्या यशाच्या पायावर नवी उभारणी करण्याची तसेच तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचिकता या क्षेत्रांसह दोन्ही देशांमधील परस्पर भागीदारीला नवी उंची मिळवून देण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Continue reading

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...
Skip to content