Homeपब्लिक फिगरनिसर्ग वाचवण्यासाठी अनेक...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.

निसर्ग

श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकरही यावेळी उपस्थित होते.

डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीवांच्या विश्वातील अनुभव कथन करताना पुस्तकातील संवेदनशीलतेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यात लेखकाने निसर्ग आणि व्यक्ती यांचा सुरेख संगम साधला आहे, असे त्यांनी नमूद केले. शब्दांच्या रानसावल्या, केवळ कागदावरील नोंदी नसून तो निसर्गाशी साधलेला एक जिवंत संवाद आहे, अशा शब्दांत प्रा. राजेंद्र केरकर यांनी लेखकाचा गौरव केला. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लेखकांनी आपापले अनुभव मांडले आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरुपात पुढे चालू राहवा. यात आपलंही छोटे योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत लेखकाने व्यक्त केले. हे पुस्तक ब्रॉडवे बुक पब्लिशिंग हाऊस, गोवा यांनी छापून प्रसिद्ध केले असून त्याची किंमत ४०० रूपये आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content