Homeडेली पल्ससोशल मीडियावरचे १८...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३ वर्षांखालील मुलांना पालकांच्या अधिकृत संमतीशिवाय कोणत्याही सोशल मीडिया किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर अकाऊंट उघडण्यास कायदेशीर मनाई करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. या विधेयकात १८ वर्षांखालील सर्व युझर्सना ‘बालक’ म्हणून परिभाषित करण्यात आले आहे. या नव्या प्रस्तावानुसार, टेक कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लहान मुलांचे डेटा ट्रॅकिंग, प्रोफाइलिंग आणि त्यांना टार्गेट करून वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्यावर पूर्णपणे बंदी असेल. तसेच, या कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनिवार्य ‘वय-पडताळणी प्रणाली’ आणि ‘पॅरेंटल कंट्रोल डॅशबोर्ड’ देणे बंधनकारक करण्यात येईल. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांचा ‘स्क्रीन टाईम’ नियंत्रित करणे, त्यांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि प्रायव्हसी सेटिंग्ज मॅनेज करणे सोपे जाणार आहे.

‘रिपोर्ट चाईल्ड हार्म’ हे विशेष बटण

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी यात अत्यंत कठोर दंडात्मक तरतुदींचा समावेश आहे. लहान मुलांना हिंसक मजकूर, जुगार, ड्रग्ज किंवा अश्लील कंटेटपासून दूर ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्लॅटफॉर्मची असेल. आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्यासाठी ‘रिपोर्ट चाईल्ड हार्म’ हे विशेष बटण देण्याचेही यात नमूद आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना १० कोटी रुपयांपर्यंतचा घसघशीत दंड होऊ शकतो. तसेच, सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ‘कलम ६९-अ’ अंतर्गत संबंधित ॲप किंवा वेबसाईट भारतात कायमस्वरूपी ब्लॉक किंवा निलंबित केली जाऊ शकते.

मुलांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

संसदेतील गदारोळामुळे शुक्रवारी हे विधेयक पटलावर येऊ शकले नाही. ‘खासगी विधेयक’ थेट कायद्यात रूपांतरित होण्याचे प्रमाण संसदीय इतिहासात कमी असले तरी, या निमित्ताने मुलांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा निर्णय घेतला असून, युरोप आणि चीनमध्येही कडक निर्बंध आहेत. याच जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारतातही लहान मुलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी स्वतंत्र आणि कडक कायदा असावा, या वाढत्या मागणीला या विधेयकामुळे बळ मिळाले आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content