Homeकल्चर +झाडाला पिकलाय आंबा.....

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल, अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दूर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केली आहे.

संगीतकार सागर पाटील त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगतात की, ‘BeatXX’ या कलाकार नावाखाली मी स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी संगीतशैली निर्माण केली आहे. मी संपूर्ण आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट देशात पहिल मराठी ढोलताशा पथक सुरू केलं. त्यासाठी मला नुकताच महाराष्ट्र शासनाकडून “मराठी भाषा सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. भावना, कथा आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा आधुनिक संगीताशी केलेला संगम यामुळे संगीताची खास ओळख ठरली आहे. दुबईस्थित माझ्या होम स्टुडिओमधून मी विविध क्षेत्रांसाठी संगीतनिर्मिती केली आहे, ज्यामध्ये लघुपटांसाठी बॅकग्राऊंड स्कोअर प्रादेशिक व अरबी चित्रपटांसाठी संगीत जाहिरातींसाठी जिंगल्स व ब्रँडेड ऑडिओ कंटेंट यांचा समावेश आहे. माझं नवं गाणं “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येईन.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content