Homeमुंबई स्पेशलमंगळवार-बुधवारी अंधेरी ते...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कमी दाबाने पाणी पुरवठा होणारा परिसर-

के दक्षिण विभाग:

मंगळवार, ११ ऑगस्ट- कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी ऍन्ड टी वसाहत (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)

कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा (सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)

बुधवार, १२ ऑगस्ट- सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल (सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.) 

पाणीपुरवठा बंद रहाणारा परिसर-

एच पूर्व विभाग: मंगळवार, ११ ऑगस्ट ते बुधवार १२ ऑगस्ट- देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे – कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व ) येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बुधवार, १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

 

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content