Homeबॅक पेजगोरेगावात रंगणार महामुंबई...

गोरेगावात रंगणार महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३

मुंबईतील अभिनव कला क्रीडा अकॅडमी, अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव, एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्पर्धा आयोजक, क्रीडा संघटक, समाजसेवक अंकुश रामचंद्र मोरे यांच्या एकसष्टीनिमित्त तिसऱ्या जिल्हास्तरीय ‘महामुंबई कबड्डी लीग’ (एमएमकेएल) या स्पर्धेचे आयोजन येत्या २६ एप्रिल ते ३ मे २०२५ या कालावधीत होणार आहे.

या स्पर्धेत उपनगरातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. या दर्जेदार स्पर्धेला अर्थातच मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची मान्यता आहे. सध्या कबड्डी या खेळाला एका आगळे वेगळे वलय प्राप्त झाले आहे. अस्सल देशी आणि मराठी मातीतील या खेळाला, तो व्यावसायिक स्तरावर खेळला जाऊ लागल्याने प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आहे. याला अर्थात प्रो-कबड्डी कारणीभूत आहे. हे लक्षात घेता हा खेळ आजच्या युवा पिढीला साद घालत आहे, हे आपण अनुभवत आहोत. या स्पर्धेमध्ये सीनियर गट (मुले-मुली) व सब-ज्युनियर गट (मुले-मुली) अशा एकूण ४२ संघांचा समावेश असणार आहे. ‘स्पोर्टबूट’ चॅनलमार्फत स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांनी दिली. आधिक माहितीसाठी ९८१९९०४२०९ यावर संर्पक साधावा.

असा असेल महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३चा कार्यक्रम

  • महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३ व सुपर सीनियर (सब-ज्युनियर-सीनियर महिला/पुरुष) राज्यस्तरीय कबड्डी लीग (४० ते ५० वयोगट आणि ५०च्या पुढे वयोगट) (महिला व पुरुष) स्पर्धा २०२५
  • कालावधी: २६ एप्रिल ते ३ मे २०२५
  • वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत
  • स्थळ: मीनाताई ठाकरे स्मृती क्रीडांगण (महानगर पालिका मैदान) न्यू म्हाडा कॉलनी, दिंडोशी, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content