Homeमाय व्हॉईसबरे झाले! उद्धव...

बरे झाले! उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले!!

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत उठाव केल्यावर गेले सात-आठ महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर शक्तीप्रदर्शन केलेले नव्हते. शिवसेना भवनात ते येत होते. परंतु तेथे ते फक्त शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना भेटत होते. बांद्रा येथील मातोश्रीच्या प्रांगणात त्यांनी शिवसैनिकांना संबोधितही केले होते. (तेव्हाची तेथील गर्दी काही शेकड्यांची होती. हीच माहिती काही मोजक्याच शिवसेना विरोधकांच्या दातात अडकून पडली होती.) मातोश्रीसमोर काय नेहमीच शिवसैनिक असतात. त्यात काय मोठे, असे कुजके बारही सोडले गेले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी बिर्ला मातुश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील शिवसैनिकांच्या गर्दीने विरोधकांची तोंडे गप्प केली आहेत, असेच म्हणावे लागेल.

शिवसैनिक आणि स्थानीय लोकाधिकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नेटाने प्रयत्न करून हा मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणावर यशस्वी केला असेच म्हणावे लागेल. शिवसेना फुटीनंतरचा हा उद्धव यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. आज मराठी भाषा दिन आणि आजपासूनच सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात मात्र राज्यपालांनी हिंदीतून केली, असा सणसणीत बोचाकारा काढत उद्धवरावांनी चौफेर टोलेबाजीस सुरुवात केली. मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम असल्याने राजकारणावर कमीच बोलेन, अशी सुरुवात करून मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी स्थानीय लोकाधिकार महासंघाने केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केल्यानंतर मात्र त्यांच्या भाषणाची गाडी राजकारणावर आली आणि ती तशी येणे आवश्यकच होते, कारण राजकारण आले नसते तर विरोधकांच्या हातात आयते कोलितच मिळाले असते…

उद्धव

अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगावर बोलणे झालेच. हा चुनाव आयोग नाही तर हा चुना लगाव आयोग असल्याची कठोर टीका करून आयोगाने आमच्यावर घोर अन्याय केला असल्याचा त्यांनी पाढाच वाचला. आमच्या पक्षाप्रमाणेच रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. त्यांचाही वाद निवडणूक आयोगाकडे गेला. परंतु या प्रकरणात मात्र आयोगाने निवडणूक चिन्ह वा पक्षाचे नाव कोणत्याही एका गटास दिले नाही. जे चालू आहे तेच चालू देण्यात आले, कारण त्या दोन्ही गटाचा भारतीय जनता पक्षास पाठिंबा आहे. हे एकच नाही तर असे अनेक पक्षपात आहेत आणि ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोतच. विरोधी गटाने आपले नाव चोरले तसेच धनुष्यबाणही चोरले पण ठाकरे हे नाव कसे चोरणार? असा खोचक सवालही त्यांनी केला.

समृद्धीवर मराठीचा दुःस्वास

याआधी बोलताना माजी उद्योग मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी समृद्धी महामार्गावरील नामफलकात मराठीचा दुःस्वास केला जात असून बाळासाहेबांच्या प्रेमाचा दिखावा करणाऱ्यांच्या राज्यात बाळासाहेबांचे नावही या महामार्गावर धड लिहिलेले नाही. इतकेच नव्हे तर त्याचे नावही मिंधे गट घेत नसल्याची तक्रार देसाई यांनी केली. या छोटेखानी समारंभात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे उद्धवजींचे आतापर्यंतचे मौन आणि जेव्हा त्यांनी मौन सोडले तेव्हा “it is better to keep your mouth closed and let people think you are a fool that’s to open it and removed all doubts” या विधानाची पुरेपूर प्रचिती आली. “politics is opium for the masses of today” हा टॅग बदलून लावण्याची शक्ती या गर्दीत दिसली असे म्हटले तर वावगे ठरू नये….

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content