नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) क्रीडा विभागाच्या सहकार्याने खेळाडूंसाठी भर्ती, पदोन्नती आणि प्रोत्साहन अशा चौकटीतील नियमांमध्ये सर्वसमावेशक सुधारणा केल्या असून 4 मार्चला...
नौदल कमांडरांच्या पहिल्या परिषदेला काल नवी दिल्लीत सुरूवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटनपर सत्रात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्रात उतरुन भारतीय नौदलाच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगणात आदीलाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 56 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेकविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि...
नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन झाल्यामुळे रामटेक...
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, 10 जून 2024 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम...
महाराष्ट्रात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ...
वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय...
कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला असल्याची...