Monday, October 28, 2024
Homeपब्लिक फिगरराजनाथ सिंह यांच्या...

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पहिली नौदल कमांडर परिषद सुरू

नौदल कमांडरांच्या पहिल्या परिषदेला काल नवी दिल्लीत सुरूवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटनपर सत्रात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्रात उतरुन भारतीय नौदलाच्या दोन विमानवाहू युद्धनौकांच्या परिचालनाच्या क्षमतेचा अनुभव घेतला. दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारताच्या सागरी हिताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नौदलाच्या वाढत्या क्षमतांचे दर्शन घडवले.

या सत्रादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल कमांडरांनादेखील संबोधित केले. भारतीय नौदलाच्या वाढत्या बहुआयामी क्षमतांबद्दल तसेच सातत्याने नेतृत्त्वाच्या भूमिकेत उदयाला येत असल्याबद्दल त्यांनी नौदलाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर (एसएजीएआर) अर्थात प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि विकास या संकल्पनेला अनुसरून हिंद-प्रशांत प्रदेशात शांतता आणि समृद्धी निर्माण करण्याच्या दिशेने नौदल करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. हिंद-प्रशांत प्रदेशात भारतीय नौदलाने राबवलेल्या सागरी चाचेगिरीविरोधी कारवायांची प्रशंसा करून संरक्षणमंत्री म्हणाले की यासाठी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीय नौदलाचे कौतुक होत आहे.

जागतिक वचनबद्धतांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासोबतच सागरी सुरक्षा तसेच भारताचे सार्वभौमत्व कायम राखण्यात नौदलाच्या महत्त्वपूर्ण योगदानावर राजनाथ सिंह यांनी अधिक भर दिला. हिंद महासागर क्षेत्रात तसेच आणखी विस्तृत अशा हिंद-प्रशांत परिसरात जर भारताचा नावलौकिक वाढला असेल तर हे आपल्या नौदलाच्या शौर्यामुळे तसेच तत्परतेमुळे घडले आहे. हिंद प्रशांत परिसरात भारतीय नौदलाने विश्वासार्हता मिळवली आहे. आपले नौदल म्हणजे जागतिक प्रतलावर भारताच्या वाढत्या पातळीचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले.

या परिषदेमध्ये संरक्षण दल प्रमुखांसह भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुखदेखील नौदल कमांडरांसह या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सामायिक राष्ट्रीय संरक्षण पर्यावरणाच्या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सेनादलांच्या एककेंद्रीकरणाबाबत चर्चा करतील. तिन्ही सेनादलांच्या दरम्यानचा समन्वय तसेच देशाच्या संरक्षणासाठीची सज्जता वाढवण्याच्या मार्गांचा शोध ते यावेळी घेतील.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content