Thursday, October 24, 2024
Homeपब्लिक फिगरलक्षद्वीपमध्ये रामदास आठवलेंनी...

लक्षद्वीपमध्ये रामदास आठवलेंनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजपासून दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत.आज त्यांचे लक्षद्वीपच्या आगत्ती विमानतळावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर आठवले यांचे लक्षद्वीपच्या बंगाराम बेटावर आगमन झाले. बंगाराम बेटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तव्य केले होते त्या प्रेसिडेन्सी विश्रामगृहात आठवले यांनी सर्वप्रथम सहकुटूंब छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. त्यानंतर बंगाराम बेटावर समुद्रात आठवले यांनी त्यांचे पुत्र जित याच्यासमवेत स्कुबा डायव्हिंगचा खोल समुद्रातील थरारक अनुभव घेतला. लक्षद्वीप दौऱ्यात आठवले यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सीमा आठवलेही आहेत.

देशाच्या समुद्रसीमांचे संरक्षण करण्यासाठी समुद्रदूर्ग उभरण्याची पहिली संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. समुद्र दूर्ग उभरण्याची देशात पाहिले सागरी आरमार उभारणारे दूरदृष्टीचे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत असे सांगत आठवले यांनी आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

लक्षद्वीप हे अत्यंत सुंदर बेट आहे. मालदीवपेक्षा अनेक पटीने लक्षद्वीप सुंदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार आपण मालदीवचा दौरा रद्द करून लक्षद्वीपला सहकुटूंब भेट दिली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीप या निसर्गरम्य सुंदर बेटाला आवर्जून भेट द्यावी. भारतीय व्यावसायिकांनी, हॉटेल इंडस्ट्रीने लक्षद्वीपकडे लक्ष दिले पाहिजे. पर्यटकांना आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे नविन हॉटेल उभारावीत, असे आवाहन त्यांनी केले.

लक्षद्वीप मध्ये उद्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच उद्या दिव्यांगजनांसाठी एडीप कॅम्पद्वारे सहाय्यक वस्तूंचे वाटप रामदास आठवले यांच्या हस्ते लक्षद्वीपची राजधानी कवरती येथे करण्यात येणार आहे. 

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content