Homeमुंबई स्पेशलमुंबईत पालिका सुविधा...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म व मृत्यू नोंदणीतल्या अर्जासाठी बालकाचे नाव समाविष्ट करणे, जन्म / मृत्यू प्रमाणपत्र दुरुस्ती, जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन QR-कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर, विवाह प्रमाणपत्र दुरुस्ती, या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नव्या संगणकीय प्रणालीच्या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेतानाच एका कालबद्ध पद्धतीने जन्म दाखल्यातल्या दुरूस्त्या करून मिळणार आहे. संगणकीय प्रणालीच्या पुढच्या टप्प्यात नागरिकांना अर्जस्थितीची माहिती देण्यासाठी एसएमएसचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

यापूर्वी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे, नोंदीतील दुरुस्ती तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील अर्ज नागरिकांना संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करावे लागत होते. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात खेटा घालाव्या लागत होत्या. तसेच अर्जांची प्रलंबित स्थिती व कामाचा भार यांचे प्रभावीपणे निरीक्षण करणे विभागासही आव्हानात्मक ठरत होते. त्या पार्श्वमभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विहित कालावधीत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या प्रणालीचा फायदा होईल, असा विश्वास अतिरिक्त पालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला आहे.

अर्जाचा पोचपावती क्रमांक उपलब्ध होणार

जन्म व मृत्यू नोंदीतील दुरुस्ती, जन्म / मृत्यू प्रमाणपत्र मिळविणे तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करणे (जन्मापासून १५ वर्षांच्या आतील) इत्यादी बाबींकरिता आवश्यक अर्ज व विहित कागदपत्रे नागरिक सुविधा केंद्राच्या कक्षाच्या ठिकाणी स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जदारास पोचपावती क्रमांक देण्यात येईल. या क्रमांकाचा वापर भविष्यातील संदर्भासाठी तसेच अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक पाठपुराव्यासाठी करता येईल. कार्यालयीन स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी व पुढील कार्यवाही संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यासाठी स्वतंत्र व सुसूत्र प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. यामुळे अर्जांची कार्यवाही, प्रलंबित अर्ज व त्यावरील निर्णय यांचे अधिक प्रभावीपणे परीक्षण करणे शक्य होणार आहे. ‘एसएमएस’द्वारे अर्जाची स्थिती जाणून घेण्याची सुविधा आगामी कळात उपलब्ध होणार आहे.

क्यू आर कोड प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र खिडकी

शैक्षणिक बाबी, परदेश दौऱ्यांसाठी तसेच विविध कारणात्सव जन्म दाखल्यांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांमार्फत मोठ्या प्रमाणात अर्ज संबंधित विभाग कार्यालयात येत असतात. अशा अर्जदारांसाठी नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन QR-कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतरीत करणे याठिकाणी शक्य होणार आहे.

सन २०१६पूर्वीच्या जन्म व मृत्यू नोंदी

सन २०१६पूर्वी नोंदविण्यात आलेल्या जन्म व मृत्यूच्या नोंदींसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या Civil Registration System (CRS) पोर्टलद्वारे नवीन स्वरूपातील जन्म/मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. अशा जुन्या नोंदींसाठी अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे अशा अर्जांच्या कार्यवाहीस तुलनेने अधिक कालावधी लागू शकतो. जुने अभिलेख व नोंदींच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करून कार्यवाहीचा कालावधी कमी करण्यासाठी पालिकेमार्फत प्रयत्न सुरू आहेत.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content