Friday, July 12, 2024
Homeपब्लिक फिगरयेत्या शुक्रवारपासून तीन...

येत्या शुक्रवारपासून तीन दिवस ताडोबा महोत्सव!

वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1955 साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिकादेखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ताडोबा

पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते. या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. निसर्ग प्रश्नमंजुषा, पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केजसारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

ताडोबा

कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समुहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

71व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन

जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’ होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला. ११२ देशातून आलेल्या विश्व सुंदरीनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईल, अशी भावना वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ जुलिया मॉरली, २०२३ची मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना, जमिल सैदी यावेळी उपस्थित होते.

वाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होती, जी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटते, जेणेकरून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील, असे त्यांनी सांगितले.

मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ जुलिया मॉरली म्हणाल्या की, आम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या ॲम्बेसेडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाही, तर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणे, त्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!