Homeकल्चर +'माझ्या सोन्या'तली अभिनेत्री...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया या तिन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. मानसशास्त्र विषयात बी.ए. पदवी घेतल्यानंतर तिने आपल्या कलात्मक प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रातील आशादायी चेहरा म्हणून ओळख निर्माण केली.

गेल्या तीन वर्षांत ऐश्वर्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये काम केले आहे. ‘लाल बिंदी’, ‘माझ्या सोन्या’ आणि ‘लिपस्टिक’ या लोकप्रिय मराठी म्युझिक व्हिडिओंमधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचबरोबर मराठी चित्रपट ‘आधार कार्ड’मध्ये तिने अभिनेत्री आणि निर्माती अशा दुहेरी भूमिकेत काम करत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली. हिंदीतली ‘Band Aid’ आणि ‘Hide and Seek’ या प्रोजेक्टमधूनही तिने आपली अभिनयक्षमता सिद्ध केली असून, लवकरच तिचे अनेक मराठी रॅप म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून यूट्यूबवर १.१७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. फॅशन, लाइफस्टाइल आणि मनोरंजनाशी संबंधित तिच्या कंटेंटला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. याच लोकप्रियतेमुळे Suta Bombay, Dabur Amla, Lakmé आणि Faces Canada यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत ती जोडली गेली असून, डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणूनही वेगळी ओळख निर्माण करत आहे.

सतत शिकण्याची वृत्ती, मेहनत, शिस्त आणि आपल्या कामावरील निष्ठा हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे ऐश्वर्या मानते. अभिनय, चित्रपटनिर्मिती आणि डिजिटल माध्यमांमध्ये सातत्याने नवीन संधी स्वीकारत ती आपल्या करिअरला नवी दिशा देत आहे. आगामी काळात तिच्या अनेक नव्या चित्रपट, म्युझिक व्हिडिओ आणि डिजिटल प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content