स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची...
हिंदी चित्रसृष्टीतला गाजलेले अभिनेता, माजी खासदार गोविंदा यांची आज रिपब्लिकन पार्टीचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली....
आजवर केवळ चाचणी तसेच प्रवाशांची आवडनिवड याबाबत चलोच्या बेस्ट एअरपोर्ट एक्स्प्रेस बसचे सर्वेक्षण सुरू होते. मात्र आता चलोच्या बेस्ट एअरपोर्ट एक्स्प्रेस, या मुंबईतल्या प्रीमियम...
मुबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांत आता महानगरपालिकेच्या उद्यान विभागानेही पुढाकार...
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव (Flowershow-२०२४) अत्यंत दिमाखात साजरा झाला. विविध वृक्षप्रेमी, विद्यार्थी, बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्यासोबतच जवळपास १.५ लाख मुंबईकरांनी या...
ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ई-मेल आयडी...
मुंबईत आले आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली नाही, असा पर्यटक, अभ्यासक विरळाच. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरते ते...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामधील उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या व मुंबईतल्या भटवाडी, घाटकोपर येथे राहणाऱ्या सीमा बापू माने ह्यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत...