Saturday, February 8, 2025
Homeमुंबई स्पेशलमुंबईत मार्चपर्यंत होणार...

मुंबईत मार्चपर्यंत होणार ७०% भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण

भटक्या श्वानांच्या (कुत्र्यांच्या) चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या पैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.

याबाबत तपशिलवार माहिती देताना पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आदी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.

याच धर्तीवर, सप्टेंबर २०२३पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे. सन २०१४च्या गणनेनुसार, मुंबई महानगरात भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. तर, मार्च २०२४च्या शेवटपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ऍनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, यूनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पठाण यांनी दिली. 

पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या निरंतर अभियानामध्ये नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content