Monday, October 28, 2024
Homeमुंबई स्पेशलउद्यापासून शिवाजी पार्कवर...

उद्यापासून शिवाजी पार्कवर रंगणार पुराणिक स्मृती चषकाचे सामने

मुंबईतल्या माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी सांभाळणार्‍या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या क्रिकेट आणि संघटन कौशल्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही दिग्गज संस्थांनी एकत्र येऊन प्रकाश पुराणिक स्मृती करंडक स्पर्धेचे सलग दुसर्‍या वर्षीही आयोजन केले आहे. या स्मृती करंडकासाठी १६ महिला संघाचे टी-२० द्वंद्व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) चार ग्राऊंड्सवर २० ते २३ फेब्रूवारीदरम्यान रंगणार आहे.

स्वत: उत्तम क्रिकेटपटू असलेल्या दिवंगत प्रकाश पुराणिक यांनी माहिम ज्युवेनाईल आणि शिवाजी पार्क जिमखाना या दोन्ही क्लबचा कार्यभार यशस्वीपणे हाताळला होता. त्यांचे क्रिकेटप्रेम आणि त्यांच्या क्लब कारकीर्दीला सलाम ठोकण्यासाठी हे दोन्ही क्लब एकत्र आले आणि त्यांनी गेल्या वर्षापासून प्रकाश पुराणिक स्मृती करंडक स्पर्धेचे आयोजन सुरू केले. यंदाही ते आयोजन केले जात असून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने महिला टी-२० स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे. या निमित्ताने शिवाजी पार्कच्या मैदानावर पुढील चार दिवस महिला क्रिकेटची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. खुद्द या स्पर्धेला आणि महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 

राजावाडी क्रिकेट क्लब आणि दहिसर स्पोर्ट्स क्लब यांच्यात माहिम ज्युवेनाईल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर उद्घाटनीय सामना रंगणार असून उद्या २० फेब्रूवारीला सकाळी ८.३० वाजता राज ठाकरे या स्पर्धेचे उद्घाटन करतील, अशी माहिती माहिम ज्युवेनाईलचे अध्यक्ष विजय येवलेकर यांनी दिली.

महिला क्रिकेटला नवी उभारी मिळावी म्हणून आयोजित होणार्‍या या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला प्रकाश पुराणिक करंडकासह ५० हजार रुपयांचे रोख इनामही दिले जाणार आहे. उपविजेता संघ २५ हजार रुपयांचा मानकरी ठरले. तसेच उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून अनेक वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आल्याची माहिती सचिव सुनील पाटील आणि कोषाध्यक्ष महेश शेट्ये यांनी दिली.

या स्पर्धेत एकंदर १६ संघ बाद फेरीत खेळणार असून राजावाडी, दहिसरसह ग्लोरियस क्रिकेट क्लब, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टिंग युनियन, वेंगसरकर फाउंडेशन, जे. भाटिया स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, डी डीव्हीजन विजेता, पीडीटीएसए स्पोर्ट्स क्लब, फोर्ट यंगस्टर्स, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, बोरीवली क्रिकेट क्लब, सी डिव्हीजन विजेता आणि भारत क्रिकेट क्लब हे संघ आपले कौशल्यपणाला लावतील. पहिल्या दिवशी बाद फेरी, दुसर्‍या दिवशी उपांत्यपूर्व फेरी आणि तिसर्‍या दिवशी उपांत्य सामने खेळविले जातील. स्पर्धेची जेतेपदाची लढत शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिम ज्युवेनाईलच्या मैदानावर खेळविली जाईल.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content