नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...
हवेतून होणारे संक्रमण कमी करू शकणारे एक नाविन्यपूर्ण, हरित, नवीन प्रतिजैविक एअर फिल्टर तंत्रज्ञान नुकतेच विकसित करण्यात आले आहे. हे एअर फिल्टर सामान्यत: ग्रीन...
टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की, स्तनांच्या कर्करोगाने पीडित रुग्णांच्या उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश अतिशय फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या समावेशामुळे डिसिजफ्री सर्वायवल...
मानसिक आरोग्याचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असलेले महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे किती आवश्यक आहे हे कोरोना...
गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरणाची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देणे गरजेचे असते....
कोविडने मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जून २०२२पासून सुरू केली आहे....
कोविड-19 चा नव्या स्वरूपातील विषाणू- ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने 26 नोव्हेंबर 2021 रोजी ओमायक्रॉन (B.1.1.529) म्हणून जाहीर केले आहे, या विषाणूविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची...
कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने तिसऱ्या तुकडीतल्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले असून यात ‘डेल्टा व्हेरिअंट’चे...
मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष करून विविध उत्सव व सणांच्या काळात कोविड प्रतिबंधाबाबत...