Homeहेल्थ इज वेल्थकोविड लसीकरणासाठी मुंबईत...

कोविड लसीकरणासाठी मुंबईत ३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक’!

कोविडने मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जून २०२२पासून सुरू केली आहे. ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेखाली मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्षे वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

३ जानेवारी २०२२पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे तसेच १६ मार्च २०२२पासून १२ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी पालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसर्‍या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.

कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी १ जून, २०२२ ते ३१ जुलै २०२२पर्यंत “हर घर दस्तक मोहीम २” राबविण्यात येत आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्षे व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.

या मोहिमेत पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. जेणेकरुन, पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून व त्याद्वारे लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाज माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे.

८ पर्यटनस्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीकरण

दरम्यान, पालिकेतर्फे मुंबई महानगरातील आठ पर्यटनस्थळांवरही २८ मेपासून कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरातील गेट वे ऑफ इंडिया, काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथे स्नो वर्ल्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपरमध्ये किडझानीया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

या लसीकरणात कोविशिल्ड लस विचारात घेता, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांच्यासाठी प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिला जाईल. कोवॅक्सिन लस विचारात घेता, १५ वर्षांवरील पात्र व्यक्तींसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिला जाईल. तसेच, १२ ते १५ वर्षे वयोगटातील पात्र मुलांकरीता कोरबेवॅक्स या लसीची पहिली मात्रा / दुसरी मात्रा दिली जाईल. या आठही ठिकाणी सर्व लसी स्थळनोंदणी अर्थात ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे देण्यात येतील.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content