Homeहेल्थ इज वेल्थस्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये...

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यास खूपच फायदेशीर!

टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की, स्तनांच्या कर्करोगाने पीडित रुग्णांच्या उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश अतिशय फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या समावेशामुळे डिसिजफ्री सर्वायवल (डीएफएस)मध्ये 15% संबंधित सुधारणा आणि ओव्हरऑल सर्वायवल (ओएस)मध्ये 14% सुधारणा दिसून आली आहे.

स्तनांच्या कर्करोग पीडित रुग्णांचे आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या उपचारांचे टप्पे आणि रोगातून बरे होऊन पूर्ववत होत असतानाचे टप्पे यासारख्या बाबी विचारात घेऊन त्यांना कोणत्या प्रकारचे व्यायाम करणे जमू शकेल याबाबत योगतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याबरोबरच भौतिकोपचार तज्ज्ञांकडून माहिती घेऊन अतिशय काळजीपूर्वक योगाभ्यासांच्या या उपचारांची रचना करण्यात आली आहे. योगाभ्यासाच्या नियमावलीत अतिशय सोप्या आणि नियमित विश्रांती काळासह शरीराच्या स्थितीला पूर्ववत करणाऱ्या आसनांचा आणि प्राणायामाचा यात समावेश करण्यात आला. योग्य प्रकारची पात्रता असलेल्या आणि अनुभवी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली. त्याशिवाय अनुपालन कायम राखण्यासाठी योगाभ्यासाच्या नियमावली संदर्भातील माहितीपत्रके आणि सीडींचेदेखील वितरण करण्यात आले.

प्रतिसादकर्त्यांच्या मोठ्या समुहावर गट निकषरहित अतिशय कठोर पाश्चिमात्य रचनेनुसार केलेले हे अध्ययन असल्याने, योगाभ्यासाचा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये फायदा तपासून पाहणारी ही सर्वात मोठी वैद्यकीय चाचणी एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. स्तनांचा कर्करोग केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील महिलांमध्ये आढळणारा कर्करोगाचा अनेकदा दिसून येणारा प्रकार आहे. यामुळे महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दुप्पट प्रमाणात अस्वस्थता निर्माण होते. यातील पहिली भीती असते ती म्हणजे मृत्युची आणि दुसरी भीती असते ती उपचारांमुळे निर्माण होणाऱ्या साईड इफेक्ट्सची. आणि  त्याला तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांची. अतिशय परिश्रमपूर्वक आणि चिकाटीने योगाभ्यास केल्याने जीवनाचा उत्तम दर्जा कायम राखण्यामध्ये या पद्धतीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे आणि हा रोग पुन्हा होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका 15%नी कमी होत असल्याचे आकडेवारीमधून दिसून आले आहे.

डॉ. नीता नायर यांनी स्तनांच्या कर्करोगावर योगाभ्यासाच्या चाचण्यांचे परिणाम एका स्पॉटलाईट पेपर चर्चेमध्ये म्हणजे अमेरिकेत दरवर्षी स्तनांच्या कर्करोगावरील सर्वाधिक प्रतिष्ठेची परिषद म्हणून आयोजित होणाऱ्या सॅन ऍन्टानियो ब्रेस्ट कॅन्सर सिंपोसियम, या सध्या सुरू असलेल्या परिषदेत सादर केले. या परिषदेमध्ये सादर होत असलेल्या हजारो संशोधन पत्रिकांमधून केवळ काही निवडक संशोधन पत्रिकांचीच स्पॉटलाईट चर्चेसाठी निवड होत असते आणि आपल्या अध्ययनाला त्याच्या उच्च गुणवत्तेमुळे हा मान मिळाला आहे. स्तनांच्या कर्करोगावरच्या उपचारात परिणामकारक सहाय्य करणारा हा पहिला भारतीय उपचार ठरला आहे.

Continue reading

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...

रौनक, तन्मय, दिनेश,अमृता ठरले बेंचप्रेस स्पर्धेचे विजेते

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड यांच्यातर्फे व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे दीपक पाटकरच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या क्लासिक व इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत रौनक जितेकर, तन्मय पाटील, दिनेश पवार आणि अमृता भगतने आपापल्या गटांत सर्वोतम लिफ्टरचा मान मिळवला. समस्त पाटकर कुटुंबियांच्या सौजन्याने...
Skip to content