Homeहेल्थ इज वेल्थ५ टक्के महिलांच्या...

५ टक्के महिलांच्या स्तनात आढळल्या लक्षणीय गाठी!

एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस ठेवण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रेडिएशनमुक्त पोर्टेबल डिवाईस असून ते पेशींमधील असामान्य कडकपणा ओळखण्याचे काम करते. हे तंत्रज्ञान क्लिनिक्स, आरोग्य शिबिरे आणि थेट समुदाय स्तरावर सहजरीत्या वापरता येते.

या उपक्रमाबाबत बोलताना युई लाइफसायन्सेसच्या भारतातील सीईओ गौरी नवलकर-गोडसे म्हणाल्या की, “सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्यासाठी स्तनाच्या आरोग्याची तपासणी अधिक सहज उपलब्ध करणे आणि महिलांना वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रगतीवरून ही सुविधा थेट समुदायांपर्यंत पोहोचवण्याचे आणि असामान्य गाठ आढळल्यापासून ते वैद्यकीय मूल्यांकनापर्यंतचा मार्ग सुलभ करणे महत्त्वाचे आहे. जनजागृती, सुलभ उपलब्धता आणि पाठपुरावा यावर सातत्यपूर्ण काम करणे गरजेचे आहे.”

पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या जनरल आणि इंटरनल मेडिसिन फिजिशियन डॉ. मोनिका गोयल यांनी सांगितले, “स्तनाच्या नियमित तपासणीची सुविधा नसलेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी समुदायआधारित तपासणी महत्त्वाची भूमिका बजावते. गाठ ओळखणे हे महत्त्वाचे पहिले पाऊल असून त्यानंतर वेळेवर फॉलो-अप आणि योग्य वैद्यकीय मूल्यमापन होणे तितकेच आवश्यक आहे. हे उपक्रम वंचित घटकांमध्ये जनजागृती वाढवण्यास आणि महिलांना आरोग्यदायी पावले उचलण्यास प्रेरित करतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार

प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला. सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील...

मराठी रंगभूमीवर ओटीटीच्या धाटणीचा प्रयोग! ‘ती ची गोष्ट’!

ओटीटीच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात वेगवेगळ्या कथा, व्यक्तिरेखा आणि भावविश्वांचा अनुभव घेण्याची सवय प्रेक्षकांना झाली आहे. हाच अनुभव आता मराठी रंगभूमीवर अनोख्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी केला आहे. सुप्रसिद्ध लेखक आनंद म्हसवेकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या तीन स्वतंत्र...

माहीम चौपाटीवर मुंबईतला सी फूड प्लाझा पुन्हा कार्यरत

मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतला पहिला सी फूड प्लाझा, माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा कार्यरत झाला आहे. शनिवार, २४ ऑक्टोबरपासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे हे स्टॉल्स कार्यरत...
Skip to content