HomeArchiveअनेकदा थांबवली गेली...

अनेकदा थांबवली गेली अमरनाथ यात्रा!

Details
अनेकदा थांबवली गेली अमरनाथ यात्रा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
दुर्गम रस्ते, डोंगराळ भाग, बर्फाळ प्रदेश, ऑक्सिजनची कमतरता, कधीही कोसळणाऱ्या दरडी अशा अनेक अडचणींचा सामना करीत देशभरातील शिवभक्त बाबा अमरनाथच्या यात्रेला उत्साहाने जातात. अनेकदा अतिरेक्यांच्या धमक्या आल्या की, शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेने यात्रा सुरळीत चालू व्हायची. काही वेळा हल्ले झालेही, पण त्याची फारशी झळ यात्रेकरूंना लागली नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांत अनेकदा ही यात्रा रोखण्याचा प्रसंग आला आहे. मागील काळात विशेषतः १९९१ ते १९९५ या कालावधीत यात्रा पtर्णतः बंदच होती. याचं मुख्य कारण दहशतवादी संघटनानी यात्रा उधळून लावण्याच्या सातत्याने दिलेल्या धमक्या! २००१च्या २० जुलै रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ मंदिराजवळ शेषनाग येथे यात्री शिबिरावर ग्रेनेड फेकले. यावेळी झालेल्या दोन स्फोटात तीन महिलांसह १३ जण मृत्यूमुखी पडले तर १५ जण जखमी झाले होते. त्यापूर्वीच्या साली अंधाधुंद केलेल्या गोळीबारात २१ हिंदू तीर्थयात्री, ७ मुस्लिम नागरिक, ३ सुरक्षा दलाचे अधिकारी अशा ३२ जणांना प्राणास मुकावे लागले होते. या भीषण घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते. २००२ सालात लष्कर ए तोयबाच्या अल मंसुरीयन गटाने ३० जुलै आणि ६ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या घटनाद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

खराब हवामानामुळे २०११ साली ३ जुलै रोजी यात्रा स्थगित झाली. ती पुन्हा सोमवारी सुरू केल्यावर २० हजार यात्रेकरूंना पवित्र गुंफेकडे जाण्याची अनुमती देण्यात आली. याआधी झालेल्या भूस्खलनामुळे अकरा यात्रेकरूंना जीव गमवावा लागला. जम्मू-काश्मीरच्या रामबन भागात हिंसाचार उसळून निर्माण झालेल्या तणावाने यात्रा थांबवली गेली. त्यामुळे यात्रेकरू अनेक ठिकाणी अडकून पडले. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. पुढे रामबनच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने यात्रेत बाधा आणली हे कारण यात्रा थांबवण्यासाठी पुरेसे ठरले. आधार शिबीर आणि डोंगराळ भागाच्या मार्गावर विशेषतः गुंफेजवळ, बालटल, पहलगाम हे भाग पावसाच्या तडाख्यात होते. २०१५ च्या १० नि १२ जुलै रोजी यात्रेला रोखलं गेलं. त्यानंतरही भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता. पुढे ऑगस्ट महिन्यात ८ तारखेला उधमपूर जिल्ह्यात झालेल्या पावसाने आणि जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेने यात्रा थांबली.

बाबा अमरनाथ यात्रेला अडथळे येणं पुढील वर्षी २०१६ लाही चुकलं नाही. पण, शिवभक्तांचा दुर्दम्य विश्वास दिसून आला. यावेळी भरपावसात २७-२८ जुलैला जवळपास ८०० भक्तांनी ३,८८० मीटर उंचीवरील बाबांच्या गुंफेत पूजाअर्चना केली. हाच प्रकार पुढच्या वर्षी २०१७ ला घडला. जोरदार पावसाने गुंफेपर्यंत जाणारे दोन्ही रस्ते घसरण्यासारखे झाले. तसेच दरडी पडण्याच्या घटना घडत राहिल्यानं यात्रा थांबलीच, शिवाय महामार्गही ठप्प झाला. बुऱ्हाण वाणी हा म्होरक्या चकमकीत ठार झाल्याने वातावरण अशांत झालं होतं. पुढच्या वर्षी यात्रा काळात त्याची बरसी आल्याने स्वतंत्र काश्मीरच्या नेत्यांनी बंदचे आवाहन करून यात्रा थांबविणे भाग पाडले. त्याचबरोबर अनुछेद ३५ A समर्थन करून अशांतता तयार केली गेली. यामुळे भक्तांना भगवती नगरच्या पुढे जाण्यास मज्जाव केला गेला. उधमपूर नि रामबन येथे सुरक्षा चौक्या उभारत यात्रेकरू जम्मू श्रीनगरच्या राजमार्गावर जाणार नाहीत याची काळजी घेतली गेली.

यंदाच्या वर्षी १ जुलै रोजी यात्रा सुरू झाली नि यात्रा स्थगितीपर्यंत देवस्थान समितीनुसार सुमारे साडेतीन लाख लोकांनी शिवलिंग दर्शन घेतले. हा आकडा गेल्या चार वर्षांतील उच्चांक मानला जातो. याही वर्षी पावसाने पाचवेळा अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने यात्रा थोडा काळ थांबवली होती. गेल्या वर्षी ६० दिवसांत सुमारे पावणेतीन लाख लोकांनी दर्शन केले. हीच आकडेवारी पुढीलप्रमाणे २०१७- २,६०,००३ (६० दिवस), २०१६-२,२०,४९० (४८ दिवस),२०१५-३,५२,७७१ (५९ दिवस). यावेळी नि गेल्यावर्षीदेखील स्थानिक काश्मीरींची रोजीरोटी असल्याने यात्रा सुरळीत होईल असा शब्द फुटीरतावादी गटाने दिला होता. मात्र, नुकताच गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानुसार, यात्रेवर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन यात्रेकरूंना परत फिरण्याचंच आवाहन करून यंत्रणा थांबली नाही, तर जबरदस्तीने बाहेर काढले जात आहे. इतकेच नव्हे तर हवाई दलाच्या विमानाचा वापरही केला जातोय. राज्यात निमलष्करी दलांची तैनाती अलिकडेच मोठ्या प्रमाणात केल्याने राज्यातील नेते हादरले असून घटनेतील कलम ३५अ हटवून विशेषाधिकार काढून घेण्याच्या हालचाली असल्याचा प्रचार करीत जनतेत अशांतता माजविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीच एन आय एने स्थानिक नेत्यांना आर्थिक मुद्द्यांवर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने नि आता सैन्य वाढ केल्याने वेगळीच अस्वस्थता पसरली होती. पाकिस्तान समर्थीत दहशतवादी संघटना हल्ला होण्याची शक्यता सांगत यात्रीच नाही तर पर्यटकांनादेखील राज्य सोडण्याचा आदेश दिला गेलाय. वास्तविक, ही यात्रा १५ ऑगस्ट रोजी संपन्न होणार होती. एक स्नाईपर रायफल नि इतर हत्यारं भुसुरूंग सापडल्याने यात्रेवर हल्ला करण्याची जमवाजमव असल्याचे सांगितले गेले. दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी चिंता करण्याचे कारण नाही, उद्याचे मला माहित नाही ते माझ्या हाती नाही असं मत व्यक्त केले.

यात्रा निश्चित दिवसांपूर्वी स्थगित केल्याने छडी मुबारक सोहळ्याचे काय होणार यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. १५ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे. याचदिवशी यात्रा समाप्ती होते. तेव्हाच छडी मुबारकचे पूजन होते. यासाठी काही श्रद्धाळूना हेलिकॉप्टरने नेऊन पूजा केली जाईल असे सांगितले जाते. पण, अधिकृतपणे कोणी काही सांगितलेले नाही. छडी मुबारक सोहळा एका चांदीच्या काठीशी निगडित आहे. या छडीत भगवान शंकर यांची अलौकिक शक्ती असल्याचे सांगतात. दंतकथेनुसार कश्यप ऋषींनी ही काठी दरवर्षी अमरनाथला आणण्याच्या बोलीवर भगवान शंकराच्या हाती सुपूर्द केली होती. नियोजित कार्यक्रमानुसार दशनामी आखाड्याचे प्रमुख महंत गिरी यांच्या नेतृत्त्वात नागपंचमी पुजनानंतर १० ऑगस्टला पहालगाम प्रस्थान, १२ ला चंदनवाडी विश्रांती, १३ ऑगस्टला शेषनागला, १४ ऑगस्टला पंच तरणी मुक्काम करून १५ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा दिवशी पवित्र गुंफेत पूजा होईल. पण, हे सर्व परवानगी मिळाल्यास केलं जाईल. हा घाईत घेतलेला निर्णय असून सरकारला काही गंभीर विषय दिसत असावा. विशेषतः सैन्य आणि पोलीस पत्रकार परिषदेत जे सांगतात त्यावरून असे वाटते असे महंत गिरी स्थानिक पत्रकारांशी बोललेत. हत्यारच मिळाली असतील तर एक दोन दिवस यात्रा थांबवता आली असती असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, यात्रा सक्तीने रोखून आधार शिबिर रिकामी केल्याने यात्रेकरू नाराज झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर उदासी नि निराशा स्पष्ट दिसत आहे. मात्र, आता काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलमच सरकारनं काढल्यामुले यात्रेकरूंचे चेहरे नव्याने उजळायला हरकत नसावी.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content