Details
आदित्य नावाचा झंझावत!
07-Oct-2019
”
जयंत करंजवकर..
jayant.s.karanjavkar@gmail.com
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात २१ वर्षांचे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांनी आज आपले नेतृत्त्व सिद्धही करून दाखविले आहे. आदित्य हे नव्या पिढीचे नेते आहेत. शहरी चेहरा वाटत असला तरी त्यांनी ‘आदित्य संवाद’, ‘जन आशिर्वाद’ यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भाग पिंजून काढला आणि या संवादातून त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले. त्याचवेळी या ‘आदित्य संवाद’ व्यासपीठावर काही प्रश्न संबंधित मंत्री, आमदार यांना सांगून तरूणांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘आदित्य संवाद’मध्ये काही महाविद्यालयातील विद्यार्थींनी महाविद्यालयात वेळेवर जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी शिवसेनेतर्फे खासगी दोन बसेस त्यांनी मिळवून दिल्या. या संवाद यात्रेतून आदित्य ठाकरे यांनी एक आश्वासक नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख करून दिली.
महात्मा गांधी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे होते. परंतु सुरूवात कशी करावी म्हणून त्यांनी बाळकृष्ण गोखले यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला. त्यावेळी त्यांना गोखले यांनी प्रथम भारतातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, अडचणी समजून घेण्यासाठी देशभर प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. याची आठवण आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेमुळे प्रकर्षाने झाली. महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर आदित्य ठाकरेंची ओळख शेतकरी, ग्रामीण युवा आणि ज्येष्ठ नागरिकांना झाली. महात्मा गांधींचा भारत व आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र प्रवास यात साधर्म्य आहे. त्याचा लाभ त्यांना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेनाप्रमुखांनी कारकून, शिपाई, टपरीवर चहा देणारे, लिफ्टमन अशा शिवसैनिकांना नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री केले. मात्र शिवसेनेला ५२ वर्षे होऊनही ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सत्तेपासून दूर राहिली.
आदित्य ठाकरे यांनी वयाच्या २१ वर्षात समाजकारण व राजकारणाचे धनुष्यबाण उचलले आणि हे इतके सोपे नव्हते. २१ वय हे तरूणाई ओसंडणारे वय, मौजमजा, मस्तीचे वय. तसे पाहिले तर त्यांना मौजमजा करता आली असती. पण बाळासाहेबांचे विचार त्यांच्या रक्तातच भिनल्याने आदित्य यांनीही महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारले. त्यांनी २१व्या वर्षी जरी हे धनुष्यबाण उचलले असले तरी त्यांनी त्यांची मानसिकता साधारण १६ किंवा १७ व्या वर्षी केली असेल. १६व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि आदित्य या युवराजाने महाराष्ट्र भगवामय करण्याचा विचार केला असणार. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांच्या कामात त्यांनी मेहनत, कष्ट याबाबत सातत्य ठेवले. लोकांच्या ते कायम संपर्कात राहिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या कामात प्रसंगी मुख्यमंत्री व राज्यपालांची अनेकवेळा भेट घेतली आणि त्या समस्यांना न्याय मिळवून दिला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा आश्वासक नेता म्हणून कौतुकाची पोचपावती दिली आहे.
शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ध्येयधोरणात बदल करून आदित्य यांनी ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण करण्याचे ठरविले. कारण राज्यभर शिवसेनेच्या विस्तृत पसरलेल्या शाखा, या शाखाच तमाम मराठी जनतेचे मोठे आशास्थान आहे. या शाखांमुळेच प्रत्येक मराठी माणूस हा मनातून शिवसैनिक असतो. तो ते उघडपणे सांगणार नाही किंवा तो कदाचित कट्टर शिवसैनिक नसेलही. पण त्याला शिवसेनेच्या भूमीपुत्राच्या न्यायहक्काची भूमिका मान्य असते. या विचाराने शिवसेनेची वाटचाल अखंडित ५२ वर्षे कार्यरत राहिली.
आदित्य ठाकरे आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. ठाकरे कुटुंबातील ते पहिले युवा नेते दक्षिण मुंबईतून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. आदित्य यांच्यात नावीन्यपूर्ण काहीतरी करून दाखविण्याची लढाऊ वृत्ती आहे. मुंबईतल्या जिजामाता प्राणिसंग्रालयात पेंग्विन आणण्याचा विचार मांडला तेव्हा त्यांच्यावर बालिशपणाची टीका झाली. आज जिजामाता प्राणिसंग्रलयात लोकांची गर्दी वाढली. सुट्टीच्या दिवशी ३० ते ४० हजार लोक प्राणिसंग्रालयाला भेट देतात. असा काही नाविन्यपूर्ण विचार त्यांनी वरळी मतदारसंघाच्या बाबतीत केला असावा. वरळीचा विकास केल्यानंतर अनेक पर्यटक वरळी पाहण्यासाठी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वरळीत सीफेस आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आहे. त्याठिकाणी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर एक थीम पार्क उभारण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. अर्थात आदित्य यांना खूप करण्यासारखे आहे. रेसकोर्सच्या जागेची तीन चतुर्थांश मालकी राज्य शासनाची तर एक चतुर्थांश मालकी महापालिकेची आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहून आदित्य यांना थीम पार्क स्वप्न पूर्ण करता येईल.
वरळीत मुंबईचे मूळ रहिवासी कोळी समाज मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्या जागा गावठाण भागात आहेत. या कोळी समाजाची घरे व परंपरा आहे त्या परिस्थितीत जपले तर मुंबईचे मूळ रहिवाशांना दिलासा मिळेल आणि बिल्डर लॉबी तिथे पाय ठेवण्याचे धाडस करणार नाही. विशेष म्हणजे याच वरळी मतदारसंघात बीडीडी चाळीचा अंतर्भाव आहे. वरळी बीडीडीच्या २१ चाळीत ९ हजार ६८९ रहिवासी राहतात. त्यात मराठी रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी २३ मजली तर विक्रीसाठी ६६ मजली इमारत उभी राहणार आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यासाठी अथक प्रयत्न करत असून त्यांनी बीडीडी चाळीतील मराठी माणूस मुंबईच्या मध्यवर्ती आणि कॉस्मोपॉलिटन भागात राहवे हे स्वप्न उराशी बाळगून मराठी माणसामध्ये एकोपा राहवा म्हणून जातीने ते वरळी बीडीडी चाळीत बैठका घेत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभापती मधु चव्हाण मातोश्रीवर गेल्यावर त्यांना “”कमळातला वाघ”” म्हणून उल्लेख करायचे. त्यांनी अनेकवेळा भाजपाचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर मधु चव्हाण यांच्या धडाडीच्या कार्याचे कौतुक केले आहे. हा मधु चव्हाण आमच्याकडे पाहिजे होता असे बाळासाहेब अनेकांना सांगत होते. आज मधु चव्हाण हे मुंबई म्हाडाचे सभापती आहेत. त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. तरीही ते आजही म्हाडाच्या कार्यालयात उपस्थित राहून लोकांच्या प्रश्नाला न्याय देत आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास लवकर झाला पाहिजे. आदित्य ठाकरे यांना चव्हाण यांचे सहकार्य नक्कीच मिळेल. शिवसेना आमदार सुनील शिंदे हे चव्हाण यांच्या कामाबद्दल अधिक माहिती देऊ शकतील.
वरळी मतदारसंघात सरकारी व खाजगी रिकाम्या जागेवर अनधिकृत बांधकामे आहेत आणि ते काम आजही महापालिकेचे अधिकारी, शिधावाटप अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरूच आहे. यात परप्रांतीय, बांगलादेशी यांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हे परप्रांतीय फायदा घेतात. याकडे आदित्य ठाकरे यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. महालक्ष्मी रेसकोर्स व नेहरू तारांगण येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यांना काही राजकीय नेत्यांचा आशिर्वाद आहे, हे आपण आमदार झाल्यावर आपल्या लक्षात येईलच. हेच राजकीय नेते व हितसंबंधी बिल्डर आतापासूनच तुमच्याभोवती फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी चाटुगिरीही करतील. त्याबाबत आपण सावध राहवे. मातोश्रीवर येणारे आणि मंत्रालयात येणारे यात फरक आहे. आता आपले आदित्ययान मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. तुमचा अनुभवाची व्याप्ती वाढेल आणि ती वाढणे अत्यावश्यक आहे. नवा महाराष्ट्र त्यातूनच घडणार आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हीच शिवबाची इच्छा आहे. आपल्या हातून हे सत्कार्य घडावे. आदित्यजी, तुमच्या सत्कार्याला शुभेच्छा.”
जयंत करंजवकर..
jayant.s.karanjavkar@gmail.com
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात २१ वर्षांचे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांनी आज आपले नेतृत्त्व सिद्धही करून दाखविले आहे. आदित्य हे नव्या पिढीचे नेते आहेत. शहरी चेहरा वाटत असला तरी त्यांनी ‘आदित्य संवाद’, ‘जन आशिर्वाद’ यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भाग पिंजून काढला आणि या संवादातून त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले. त्याचवेळी या ‘आदित्य संवाद’ व्यासपीठावर काही प्रश्न संबंधित मंत्री, आमदार यांना सांगून तरूणांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘आदित्य संवाद’मध्ये काही महाविद्यालयातील विद्यार्थींनी महाविद्यालयात वेळेवर जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी शिवसेनेतर्फे खासगी दोन बसेस त्यांनी मिळवून दिल्या. या संवाद यात्रेतून आदित्य ठाकरे यांनी एक आश्वासक नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख करून दिली.”
“महात्मा गांधी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे होते. परंतु सुरूवात कशी करावी म्हणून त्यांनी बाळकृष्ण गोखले यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला. त्यावेळी त्यांना गोखले यांनी प्रथम भारतातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, अडचणी समजून घेण्यासाठी देशभर प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. याची आठवण आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेमुळे प्रकर्षाने झाली. महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर आदित्य ठाकरेंची ओळख शेतकरी, ग्रामीण युवा आणि ज्येष्ठ नागरिकांना झाली. महात्मा गांधींचा भारत व आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र प्रवास यात साधर्म्य आहे. त्याचा लाभ त्यांना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेनाप्रमुखांनी कारकून, शिपाई, टपरीवर चहा देणारे, लिफ्टमन अशा शिवसैनिकांना नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री केले. मात्र शिवसेनेला ५२ वर्षे होऊनही ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सत्तेपासून दूर राहिली.”
“आदित्य ठाकरे यांनी वयाच्या २१ वर्षात समाजकारण व राजकारणाचे धनुष्यबाण उचलले आणि हे इतके सोपे नव्हते. २१ वय हे तरूणाई ओसंडणारे वय, मौजमजा, मस्तीचे वय. तसे पाहिले तर त्यांना मौजमजा करता आली असती. पण बाळासाहेबांचे विचार त्यांच्या रक्तातच भिनल्याने आदित्य यांनीही महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारले. त्यांनी २१व्या वर्षी जरी हे धनुष्यबाण उचलले असले तरी त्यांनी त्यांची मानसिकता साधारण १६ किंवा १७ व्या वर्षी केली असेल. १६व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि आदित्य या युवराजाने महाराष्ट्र भगवामय करण्याचा विचार केला असणार. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांच्या कामात त्यांनी मेहनत, कष्ट याबाबत सातत्य ठेवले. लोकांच्या ते कायम संपर्कात राहिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या कामात प्रसंगी मुख्यमंत्री व राज्यपालांची अनेकवेळा भेट घेतली आणि त्या समस्यांना न्याय मिळवून दिला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा आश्वासक नेता म्हणून कौतुकाची पोचपावती दिली आहे.”
“शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ध्येयधोरणात बदल करून आदित्य यांनी ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण करण्याचे ठरविले. कारण राज्यभर शिवसेनेच्या विस्तृत पसरलेल्या शाखा, या शाखाच तमाम मराठी जनतेचे मोठे आशास्थान आहे. या शाखांमुळेच प्रत्येक मराठी माणूस हा मनातून शिवसैनिक असतो. तो ते उघडपणे सांगणार नाही किंवा तो कदाचित कट्टर शिवसैनिक नसेलही. पण त्याला शिवसेनेच्या भूमीपुत्राच्या न्यायहक्काची भूमिका मान्य असते. या विचाराने शिवसेनेची वाटचाल अखंडित ५२ वर्षे कार्यरत राहिली.”
“आदित्य ठाकरे आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. ठाकरे कुटुंबातील ते पहिले युवा नेते दक्षिण मुंबईतून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. आदित्य यांच्यात नावीन्यपूर्ण काहीतरी करून दाखविण्याची लढाऊ वृत्ती आहे. मुंबईतल्या जिजामाता प्राणिसंग्रालयात पेंग्विन आणण्याचा विचार मांडला तेव्हा त्यांच्यावर बालिशपणाची टीका झाली. आज जिजामाता प्राणिसंग्रलयात लोकांची गर्दी वाढली. सुट्टीच्या दिवशी ३० ते ४० हजार लोक प्राणिसंग्रालयाला भेट देतात. असा काही नाविन्यपूर्ण विचार त्यांनी वरळी मतदारसंघाच्या बाबतीत केला असावा. वरळीचा विकास केल्यानंतर अनेक पर्यटक वरळी पाहण्यासाठी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वरळीत सीफेस आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आहे. त्याठिकाणी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर एक थीम पार्क उभारण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. अर्थात आदित्य यांना खूप करण्यासारखे आहे. रेसकोर्सच्या जागेची तीन चतुर्थांश मालकी राज्य शासनाची तर एक चतुर्थांश मालकी महापालिकेची आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहून आदित्य यांना थीम पार्क स्वप्न पूर्ण करता येईल.”
वरळीत मुंबईचे मूळ रहिवासी कोळी समाज मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्या जागा गावठाण भागात आहेत. या कोळी समाजाची घरे व परंपरा आहे त्या परिस्थितीत जपले तर मुंबईचे मूळ रहिवाशांना दिलासा मिळेल आणि बिल्डर लॉबी तिथे पाय ठेवण्याचे धाडस करणार नाही. विशेष म्हणजे याच वरळी मतदारसंघात बीडीडी चाळीचा अंतर्भाव आहे. वरळी बीडीडीच्या २१ चाळीत ९ हजार ६८९ रहिवासी राहतात. त्यात मराठी रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी २३ मजली तर विक्रीसाठी ६६ मजली इमारत उभी राहणार आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यासाठी अथक प्रयत्न करत असून त्यांनी बीडीडी चाळीतील मराठी माणूस मुंबईच्या मध्यवर्ती आणि कॉस्मोपॉलिटन भागात राहवे हे स्वप्न उराशी बाळगून मराठी माणसामध्ये एकोपा राहवा म्हणून जातीने ते वरळी बीडीडी चाळीत बैठका घेत आहेत.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभापती मधु चव्हाण मातोश्रीवर गेल्यावर त्यांना “”कमळातला वाघ”” म्हणून उल्लेख करायचे. त्यांनी अनेकवेळा भाजपाचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर मधु चव्हाण यांच्या धडाडीच्या कार्याचे कौतुक केले आहे. हा मधु चव्हाण आमच्याकडे पाहिजे होता असे बाळासाहेब अनेकांना सांगत होते. आज मधु चव्हाण हे मुंबई म्हाडाचे सभापती आहेत. त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. तरीही ते आजही म्हाडाच्या कार्यालयात उपस्थित राहून लोकांच्या प्रश्नाला न्याय देत आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास लवकर झाला पाहिजे. आदित्य ठाकरे यांना चव्हाण यांचे सहकार्य नक्कीच मिळेल. शिवसेना आमदार सुनील शिंदे हे चव्हाण यांच्या कामाबद्दल अधिक माहिती देऊ शकतील.”
“वरळी मतदारसंघात सरकारी व खाजगी रिकाम्या जागेवर अनधिकृत बांधकामे आहेत आणि ते काम आजही महापालिकेचे अधिकारी, शिधावाटप अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरूच आहे. यात परप्रांतीय, बांगलादेशी यांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हे परप्रांतीय फायदा घेतात. याकडे आदित्य ठाकरे यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. महालक्ष्मी रेसकोर्स व नेहरू तारांगण येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यांना काही राजकीय नेत्यांचा आशिर्वाद आहे, हे आपण आमदार झाल्यावर आपल्या लक्षात येईलच. हेच राजकीय नेते व हितसंबंधी बिल्डर आतापासूनच तुमच्याभोवती फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी चाटुगिरीही करतील. त्याबाबत आपण सावध राहवे. मातोश्रीवर येणारे आणि मंत्रालयात येणारे यात फरक आहे. आता आपले आदित्ययान मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. तुमचा अनुभवाची व्याप्ती वाढेल आणि ती वाढणे अत्यावश्यक आहे. नवा महाराष्ट्र त्यातूनच घडणार आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हीच शिवबाची इच्छा आहे. आपल्या हातून हे सत्कार्य घडावे. आदित्यजी, तुमच्या सत्कार्याला शुभेच्छा.”
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेशिवतीर्थआदित्य ठाकरेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरळीमातोश्री’आदित्य संवाद”जन आशिर्वाद’

