HomeArchiveकॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा...

कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील अग्रेसर फूड टेक कंपनी फीडिंगबिलियन्स बी२बी कॉन्ट्रॅक्ट कॅटरिंग ब्रँड फीस्टलीद्वारे देशातील कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी जेवणाचा पर्याय प्रदान करीत आहे. फीस्टलीने आपली पोहोच आणखी विस्तारत आता मुंबई शहरात प्रवेश केला आहे. हा ब्रँड सध्या दिल्ली-एनसीआर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मुंबईसह उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानसह सहा मजबूत ठिकाणी सेवा देत आहे. फीस्टली मुंबईत नेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत काम करणार असून येत्या काही महिन्यात मुंबईतील मोठ्या औद्योगिक कँटीन किंवा मेस मॅनेजमेंट प्लॅटफॉर्ममध्ये स्मार्ट मिल सोल्युशन देण्याचे फीस्टलीचे उद्दिष्ट आहे.”
 
“२०१७मध्ये स्थापन झालेली फीस्टली फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी जेवणाचा पर्याय दररोज प्रदान करीत असून कंपनीने आतापर्यंत ३ दशलक्षहून अधिक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवले आहे. २०२२पर्यंत मुंबईत दरवर्षी १ दशलक्षपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याचे फीस्टलीचे लक्ष्य आहे. कंपनीने सेवा दिलेल्या काही ग्राहकांमध्ये सॅमसंग, पेटीएम, एचसीएल, युबीईआर, एअरटेल, नोकिया, आयडिया, हॅवेल्स आणि आयआरसीटीसीचा समावेश आहे.”
 
“फीस्टली बाय फीडिंगबिलियन्सचे संस्थापक आणि सीईओ सार्थक गहलोत म्हणाले की, कार्यस्थळी कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा अनुभव नव्याने मांडण्यासाठी वचनबद्ध असल्याने फीडिंग बिलियन्सची वृद्धी होत आहे. आतापर्यंतचा प्रवास लाभकारक ठरला असून देशातील विविध ग्राहकांशी जोडले गेल्याने कंपनीला बाजारपेठेचाही मोठा आधार मिळाला, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबईत आमच्या सर्व पाहुण्यांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यावर भर देऊन कॉन्ट्रॅक्ट केटरिंग कॅप्चर करणे तसेच आरोग्यदायी मेनू प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content