मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कमी दाबाने पाणी पुरवठा होणारा परिसर-
के दक्षिण विभाग:
मंगळवार, ११ ऑगस्ट- कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी ऍन्ड टी वसाहत (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)
कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा (सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)
बुधवार, १२ ऑगस्ट- सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल (सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)
पाणीपुरवठा बंद रहाणारा परिसर-
एच पूर्व विभाग: मंगळवार, ११ ऑगस्ट ते बुधवार १२ ऑगस्ट- देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे – कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व ) येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
बुधवार, १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

