Homeडेली पल्सबिहारच्या नालंदात शीतलामाता...

बिहारच्या नालंदात शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने धावपळ उडाली. त्यामुळे भक्तांची झुंबड उडाली आणि त्याचे पर्यावसान चेंगराचेंगरीत झाले. जखमींना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बिहार सरकारने मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. बिहार सरकारने पीडित कुटुंबांना आपत्कालीन निधीतून ₹ ४ लाख आणि मुख्यमंत्री मदत निधीतून ₹ २ लाख असे एकूण ₹ ६ लाख सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ₹ २ लाख व जखमींना ₹ ५०,००० देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजच नालंदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राजगीरमध्ये आल्या होत्या. त्यांच्या सुरक्षेसाठी बहुतांश पोलीस तैनात असल्याने मंदिराकडे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content