Homeमुंबई स्पेशलआता कुर्ला-साकी नाका...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’ ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी महापालिका मुख्यालयात केली. यावेळी अनेक नगरसेवक उपस्थित होते. या प्रतिकृतीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर महापौर तसेच अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी तिच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमीजास्त करता येणे, काळोखात दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावर परावर्तक रंग लावणे किंवा लुकलुकणारे दिवे बसवणे, अशा सूचनांचा यात समावेश होता.

नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या चौकोनी आकाराच्या ‘मॅनहोल रेलगार्ड’ची रचना मजबूत आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. उंची १ मीटर, लांबी १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असा आकार असलेल्या या रेलगार्डमध्ये, गरजेनुसार व ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी २२५ किलो आणि ८० किलो असे दोन वेगवेगळे वजनी पर्याय उपलब्ध आहेत. ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतल्या एल प्रशासकीय विभागात वापरात आणली जाणार आहे. या विभागात प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर, तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे ‘मॅनहोल रेलगार्ड’बाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content