Homeचिट चॅटदिनकर पाटील, शकुंतला...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी सातत्याने झगडणारे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या २६व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. कबड्डीसाठी आयुष्यभर योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्त्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला जाणार आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता, रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

कबड्डी दिन पुरस्कार विजेते

कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार: दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे).

ज्येष्ठ पत्रकार: मंगेश वरवडेकर (दै. सामना), अल्ताफ कडकाले (दै. सकाळ)

ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार: आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत.

ज्येष्ठ पंच पुरस्कार: प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल, मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे.

ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार: सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर, तुळसीदास रोकडे, ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड

रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर)

कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे

फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे), सुहास कदम (मुंबई उपनगर)

किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते

किशोर गट: सूरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर)

किशोरी गट: आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर)

कुमार गट: शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी)

कुमारी गट: संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली)

किशोर-किशोरी गट शिष्यवृत्ती: दीपराज कांबळे (परभणी), मैत्री इंगळे (सातारा)

सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार: सौरभ राऊत (अहिल्यानगर), यामिका पुजारी (मुंबई उपनगर)

उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार: शिवम पठारे, (अहिल्यानगर), निकिता पडवळ (पुणे)

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व

कुमार गट: प्रसाद दिलीप (पुणे)

कुमारी गट: सेरेना म्हस्कर (मुंबई उपनगर)

प्रथम जिल्हा संघ पुरस्कार: अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटना

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा: नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व सह्याद्री युवा मंच सिन्नर, नाशिक

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content