Homeटॉप स्टोरीनितीश आज होणार...

नितीश आज होणार पायऊतार, सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज दुपारी ४ वाजता पाटण्यात होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. याच बैठकीत बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल. त्याआधी भाजपाचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांंच्या अध्यक्षतेखाली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात भाजपाच्या गटनेत्याचे नाव निश्चित केले जाईल. चौहान भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाटण्यात उपस्थित आहेत. सूत्रांच्या मते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. उद्या बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ वाजता पाटण्याच्या लोकभवनमध्ये हा कार्यक्रम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रसंगी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाबरोबर सत्तेत राहूनही भाजपाला मुख्यमंत्रीपद मिळाले नव्हते. यावेळी सम्राट चौधरींच्या रूपाने भाजपाला भिहारमध्ये पहिलावहिला मुख्यमंत्री मिळू शकतो.

सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बिहारमधून नुकतीच राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यामुळे आज ते पाटण्यात बिहारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावतील. या बैठकीत ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करतील. याचवेळी ते आपल्या मंत्रिमंडळाचाही राजीनामा देण्याचा ठराव पारित करतील. गेल्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार सतावत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही यामुळे एनडीएला मोठी कसरत

करावी लागली होती. काही मोजक्या वेळीच नितीश कुमार यांना प्रचारात व्यासपीठावर बोलायला उभे करत. लिहून दिलेले भाषण वाचून झाले की त्यांना लगेचच खुर्चीवर बसवले जाई आणि लवकरात लवकर व्यासपीठावरून उतरवले जायचे. त्यामुळे जेव्हा एनडीएचे सरकार सत्तेवर यायचे निश्चित झाले तेव्हाच नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, लोकभावनांचा विचार करत नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्यात आले. पण नंतर अवघ्या चार महिन्यांतच त्यांना पायऊतार व्हावे लागत आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी अलीकडेच सक्रीय राजकारणात प्रवेश केला असून त्यांनी जनता दल (युनायटेड)चे सदस्यत्व स्वीकारले आहे. उद्या स्थापन होणाऱ्या भाजपाच्या नेतृत्त्वाखालील बिहार सरकारमध्ये निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य झाल्यामुळे लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण, तिथेही त्यांच्या आजारपणाचा प्रश्न पुढे येणारच आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते कोणता मार्ग काढतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content