Homeचिट चॅटएमजेएससी कॅरम स्पर्धेत...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतला निर्णायक बोर्डातील अप्रतिम फिनिशद्वारे १५-९ असे पराभूत केले. शेवटचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे आर्यन राऊतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक यशवंत किल्लेदार, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील, महेश शेट्ये, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिवाजीपार्क येथील एमजेएससी स्पर्धेमधील उपांत्य फेरीत आर्यन राऊतने शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचेला तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला नमवले. विविध जिल्ह्यातील ४२ शालेय खेळाडूंमध्ये होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीची चैतन्या पोमेंडकर, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीचे प्रसाद माने व शिवांश मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, सीएनएम स्कूलचे अर्णव शाह व दैविक जैन, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची सारा देवन यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार स्ट्रायकरसह पटकाविला.

स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना रुपये पाचशेचा विशेष पुरस्कार देण्यात आला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content