Homeटॉप स्टोरीखासगी आस्थापनांनाही 'पोश'...

खासगी आस्थापनांनाही ‘पोश’ कायदा बंधनकारक!

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाचे सर्व सरकारी विभाग, निमशासकीय कार्यालये यांच्याबरोबरच खासगी आस्थापनांनीही प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट (पोश) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. याकरीता सर्व आस्थापनांनी कार्यालयांतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. ज्या कार्यालयांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कंपनी, नगरपरिषद, तसेच शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाकडून निधी प्राप्त करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये त्याचप्रमाणे खासगी कंपन्या, उद्योग, सेवा पुरवठादार संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, मनोरंजन क्षेत्रातील संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा संकुले आदी सर्व खासगी आस्थापनांनाही हा नियम लागू आहे.

अंमलबजावणी करा नाही तर 50,000 दंड भरा

कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखाला कलम 26नुसार 50,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दंड दुपटीने वाढविणे, आस्थापनेचा परवाना रद्द करणे किंवा अन्य कठोर कारवाई करण्याचीही या कायद्यात तरतूद आहे. अंतर्गत समितीची माहिती केंद्र सरकारच्या शी बॉक्स पोर्टलवर (shebox.wcd.gov.in) अद्ययावतपणे अपलोड करावी लागेल. या आस्थापनांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना ज्या कार्यालयात अंतर्गत समितीचे फलक दिसणार नाहीत त्यांनी त्याबाबत 181 या महिला हेल्पलाईनवर तक्रार करावी. असे आवाहनही आयुक्त गुंडे यांनी केले आहे.

Continue reading

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच...

E20मुळे गाड्या खराब होतात हा हेतूपुरस्सर चाललेला अपप्रचार!

अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले. ॲड. अमितकुमार...
Skip to content