Homeडेली पल्सअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या विविध विद्याशाखांमध्ये तंत्रशिक्षण ही अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता तसेच उद्योजक होण्याची संधी उपलब्ध होते. दहावीनंतर तीन वर्षांच्या कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याबरोबरच रोजगार व उद्योग क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधूनच रु. 1 लाख प्रति महिना पगाराच्या नोकऱ्या औद्योगिक क्षेत्राकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले.

अभियांत्रिकी

तंत्रशिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून पदविका अभ्यासक्रमासाठी NEP 2020 अनुरूप अद्यावत ‘K Scheme’ अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ही आहेत त्याची काही ठळक वैशिष्ट्येः

  • Outcome-based, Credit System (६ सत्रे, एकूण १२० क्रेडिट्स)
  • इंग्रजी व मराठी द्विभाषिक शिक्षण व परीक्षा पर्याय
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व कौशल्य विकासासाठी Soft Skills, Social & Life Skills, Yoga, Entrepreneurship, Indian Knowledge System, Essence of Indian Constitution, Environment & Sustainability, Management, Entrepreneurship & Startup, Seminar इ. विषयांचा अंतर्भाव
  • IoT, Robotics, Drone Technology, Python Programming, ५G, Cloud Computing, Data Analytics, Cold Chain Management, EV technology, Machine Learning, AI, Green Building, Energy Conservations, UI/UX Designing इ. उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर आधारित विषयांचा कौशल्य वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रमात समावेश
  • औद्योगिक प्रशिक्षण ६ आठवड्यांवरून वाढवून १२ आठवडे
  • NCrF नुसार NAD (National Academic Depository) च्या Academic Bank of Credits (ABC) मध्ये विद्यार्थ्यांचे credits जमा करण्यात येतात.
  • विद्यार्थ्यांमध्ये Technical skills रुजविण्यासाठी प्रत्येक सत्रात Micro Projects आणि अंतिम सत्रात Capstone Project चा अंतर्भाव

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्याच्या दष्टीकोनातून 9 Centres of Excellence (Robotics, IoT, 3D Printing), 41 Multipurpose Computer Centres व 5 E-Yantra Labs ची स्थापना करण्यात आलेली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अद्यावत अभ्यासक्रम व विविध उपक्रमांमुळे शैक्षणिक वर्ष 20२२-२३मध्ये 80 टक्के असलेली पदविका अभ्यासक्रमांच्या एकुण प्रवेशित विद्यार्थ्यांची टक्केवारी शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये 95 टक्के एवढी झालेली आहे.
पदविका प्रवेशप्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तसेच प्रवेशासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी, नावनोंदणी व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content