Homeकल्चर +कोमसाप दादरची रंगली...

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग’ कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात झाला. कार्यक्रमात कोमसाप दादर शाखामधील ज्येष्ठ ते तरुण अशा कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला व आपले स्वरचित काव्य सादर केले.

कार्यक्रमासाठी आमंत्रित अतिथी म्हणून विद्या प्रभू, कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष व जगदीश भोवड, पत्रकार व कोमसाप मुंबई जिल्हा प्रतिनिधी तर प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप दादर शाखाध्यक्ष अंजना कर्णिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिलीप गांगल, स्कॉप अध्यक्ष, चंद्रकांत कवळी, सचिव, सुरेंद्र पोतदार, समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी अगदी मनसोक्त कविता आणि गीतांचा आस्वाद घेतला. अगदी आनंददायी वातावरणात सदर कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादर शाखा सचिव कवी मनोज धुरी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता दादर शाखेचे अध्यक्ष, कार्यवाह यांच्यासोबत सहकार्यवाह कवी समीर बने यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात विद्या प्रभू, अंजना कर्णिक, डॉ. शिल्पा जोशी, कवी चंद्रकांत कवळी, मनोज धुरंधर, समीर बने, सुरेश कापडोसकर, निर्मला देऊसकर, सुप्रिया ठोकळ, युवा प्रतिनिधी वनश्री राडे व स्कॉपच्या काही सभासदांनी आपापल्या कविता, गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content