Homeचिट चॅटकोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या.

यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश भोवड यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी एकनाथ तांबवेकर, सचिवपदी संपदा मुळगावकर, खजिनदारपदी ज्योती कपिले यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मधुमंजिरी गटणे, रविकिरण पराडकर, श्रीकांत म्हात्रे, प्रशांत राऊत, वंदना पाटील आणि विकास वराडकर यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अरुण मोर्ये यांनी काम पाहिले.

Continue reading

एसआयआरसाठी लागणारी माहिती जमा करा ८ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदारयादीतील सर्व मतदारांनी येत्या ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीला येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले...

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...
Skip to content