Homeएनसर्कलपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार सुफी संगीत महोत्सवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुजफ्फर अली यांनी 2001 साली सुरू केलेला, रूमी फाऊंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव, यंदा आपले 25वे वर्ष साजरे करत असून, 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे.

पंतप्रधान हे देशातील वैविध्यपूर्ण कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे मोठे पुरस्कर्ते आहेत. याच अनुषंगाने ते जहान-ए-खुसरो या सुफी संगीत, कविता आणि नृत्यासाठी समर्पित असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव आमीर खुसरो यांचा वारसा साजरा करण्यासाठी जगभरातील कलाकारांना एकत्र आणत आहे. यावेळी पंतप्रधान महोत्सवातील टीईएच बझार (टीईएच – द एक्सप्लोरेशन ऑफ द हँडमेड) येथेदेखील भेट देतील, जेथे एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातील उत्पादने आणि देशभरातील विविध उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. या महोत्सवात हस्तकला आणि हातमागावरील लघुपटही प्रदर्शित केले जातील.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content