Homeन्यूज ॲट अ ग्लांसयंदाचा 95 टक्के...

यंदाचा 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यांत!

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांच्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात वार्षिक सरासरीच्या 95 टक्के परकीय गुंतवणूक (एफडीआय) अवघ्या 6 महिन्यांत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे आज ही माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात-

महाराष्ट्र आता थांबणार नाही!
वार्षिक सरासरीच्या 95 टक्के
एफडीआय अवघ्या 6 महिन्यात…

पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक फक्त 6 महिन्यांत आली आहे.

मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो…

माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.

याआधीची परकीय गुंतवणूक

2020-21: 1,19,734 कोटी
2021-22: 1,14,964 कोटी
2022-23: 1,18,422 कोटी
2023-24: 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांत): 1,13,236 कोटी

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content