Skip to content
Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या सौरभ काडगावकर यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुमती गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने सौरभ काडगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम येत्या रविवारी, ८ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तेजोवृष जोशी तबल्यावर तर ओंकार अग्निहोत्री संवादिनीवर साथ देतील.

काडगावकर

सौरभ काडगावकर हे भारतीय शास्त्रीय संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे वडील सुनील काडगावकर यांच्याकडून घेतले. पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या समर्थ मार्गदर्शनामुळेच त्यांची कला अधिक बहरली. जयपूर अत्रवली घराण्याची त्यांची गायनशैली असून काही वर्षे त्यांनी बारामती येथील गांधर्व महाविद्यालयात अध्यापन केले आहे. त्यांचे संगीतात एमएदेखील पूर्ण झाले आहे.

काडगावकर

अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

Continue reading

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...

गोरेगावच्या चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविद्येच्या जागृतीसाठी आज मुंबईतल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत 'सेलिब्रिटी योगा' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष योग उपक्रमात मराठी...