Homeडेली पल्सजळगावच्या लेकीची राष्ट्रीय...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी कॉलेजच्या एम.टेक. (सिव्हिल) तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या योगिता शर्मा आणि तिच्या मार्गदर्शिका डॉ. शिल्पा पंकज केवटे यांच्या शोधनिबंधाला ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ मिळाला.

या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे या आंतरराष्ट्रीय परिषदेत योगिता हिने संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या प्रतिष्ठित परिषदेत महाराष्ट्रातून निवड झालेली आणि पुरस्कार मिळवणारी ती एकमेव उमेदवार ठरली आहे. योगिता, ही जळगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय शर्मा यांची कन्या आहे. या अभूतपूर्व यशानंतर तिच्या कुटुंबीय, मित्रपरिवार, हितचिंतक, पिल्लई महाविद्यालय प्रशासन, जळगावकर आणि नवी मुंबईकरांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवी मुंबईत तर ठिकठिकाणी अभिनंदनाचे होर्डिंग्ज आणि बॅनार लावण्यात आले आहेत. मूळची जळगावची असलेली योगिता सध्या रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. करत आहे. तिच्या या संशोधनामुळे शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान मिळणार आहे. तिने मिळवलेले हे यश, ग्रामीण भागातील मुलींनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची जिद्द बाळगल्यास काय करता येते, याचे उत्तम उदाहरण आहे.

योगिताच्या संशोधन पेपरचा विषय

योगिता शर्मा पनवेलमधील पिल्लई कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. तिचा पेपर “शाश्वत बांधकाम आणि पर्यावरण” या विषयाशी संबंधित आहे. म्हणजे इमारत बांधताना आपण सिमेंट, वाळू, पाणी खूप वापरतो. त्यामुळे प्रदूषण वाढते. तर कमी खर्चात, टाकाऊ वस्तू (जसे फ्लाय अ‍ॅश, प्लास्टिक कचरा किंवा बांधकामाचा मलबा) वापरून मजबूत आणि पर्यावरणपूरक कॉंक्रिट / इमारती कशा बनवता येतील आणि त्यातून ऊर्जा-विजेची बचत कशी करता येईल, यावर त्यांचे संशोधन आहे. डॉ. शिल्पा केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पेपर तयार झाला आहे.

सामान्य माणसाला व्यवहारात नेमका काय फायदा?

हेच संशोधन उद्या आपल्या रोजच्या जीवनात खूप उपयोगी पडणार आहे.

  • घराचे बिल कमी: या तंत्रज्ञानाने बनवलेली घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतात. त्यामुळे एसी/हीटरचे वीज बिल कमी लागते.
  • कचऱ्यापासून घर: शहरातील वाढता कचरा आणि बांधकामाचा मलबा याचाच वापर करून मजबूत विटा/कॉंक्रिट बनवता येईल, त्यामुळे कचरा कमी होईल.
  • स्वस्त आणि टिकाऊ घर: सिमेंट आणि नैसर्गिक वाळूचा वापर कमी झाल्याने घर बांधण्याचा खर्च कमी होऊ शकतो आणि पनवेल-नवी मुंबईसारख्या वाढत्या शहरांसाठी परवडणारी घरे मिळू शकतात.

थोडक्यात, हा फक्त मार्कांचा पेपर नाही, तर पुढच्या पिढीसाठी स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरण वाचवणारी घरे कशी बांधायची, याचा रोडमॅप आहे. म्हणूनच एनआयटीसारख्या नामांकित संस्थेने त्याला सर्वोत्तम पेपर म्हणून गौरवले आहे.

सुरत ईएमआय स्पर्धा होती तरी काय?

एनआयटी सुरत ही भारतातील टॉप 10 सरकारी इंजिनिअरिंग संस्थांपैकी एक आहे. तिथे दरवर्षी “सस्टेनेबल टेक्नॉलॉजीस इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट” (स्टेम) नावाची आंतरराष्ट्रीय परिषद भरते.

यात काय होते?

  • देशभरातील आयआयटी, एनआयटी, आणि मोठ्या कॉलेजांमधील प्रोफेसर, पीएचडी आणि एमटेक करणारे विद्यार्थी आपले संशोधन (रिसर्च पेपर) सादर करतात.
  • यंदा 16-17 ऑक्टोबरला झालेल्या परिषदेत 300पेक्षा जास्त पेपर्स आले होते. त्यातून 40-50 पेपर निवडून सादरीकरणासाठी बोलावले जाते.
  • तज्ज्ञांच्या पॅनेलसमोर तुम्हाला तुमचे संशोधन किती नवीन आहे, ते पर्यावरणाला किती उपयोगी आहे आणि ते प्रत्यक्षात वापरता येईल का? यावर तपासले जाते.

या कठीण स्पर्धेतून भारतामध्ये दुसरा क्रमांक आणि महाराष्ट्रातून एकमेव म्हणून पिल्लई महाविद्यालयाचा पेपर निवडला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...
Skip to content