Homeकल्चर +जीवनाचे सार सांगणारा...

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट ‘अंत्यारंभ’ नोव्हेंबरमध्ये!

किरणमयी आर कामथ निर्मित ‘अंत्यारंभ’, हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन प्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय, पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण आजवरच्या ८ कोकणी चित्रपटांतील ४ कोकणी चित्रपट त्यांनी स्वतः बनविले आहेत.

‘अंत्यारंभ’ हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ. रमेश कामथ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ, विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी, संगीत प्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे. संवादलेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content