Homeकल्चर +‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ साधण्यात आला आहे. या चित्रपटाचे सूत्र काळाचा प्रवास असे आहे.

‘अच्चप्पास् अल्बम’ चित्रपटाचे दिग्दर्शन दीप्ती पिल्लाई सेल्वन यांनी केले असून कथा-पटकथा संजीव सिवन, अनिर्बन भट्टाचार्य आणि उमेश नायर यांची आहे. या कथेत भूतकाळात जाण्याची वैश्विक कल्पना मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे कथानक वडील आणि मुलाभोवती फिरणारे असून एका योगायोगाने हे दोघेजण एकमेकांचे आयुष्य जगू लागतात. दोघांच्या आयुष्याची ही अदलाबदल, दोन पिढ्यांमधील जाणीवा आणि आयुष्यातील त्यांच्या आवडीनिवडीच्या पार्श्वभूमीवर विनोदी आणि भावनिक पातळीवर उलगडत जाते. या चित्रपटात अनेक प्रतिष्ठित कलावंतांच्या भूमिका आहेत. त्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अंजना अप्पुकूट्टन, आदिनाथ कोठारे, प्रियांका नायर आणि सिद्धार्थ सिवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक अंगाची जबाबदारी प्रतिष्ठित तंत्रज्ञांनी उचलली आहे. छायाचित्रण मनोज पिल्लई यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक श्रीकर प्रसाद यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. संगीत संयोजन गुलजार सिंग यांचे आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक दीप्ती सिवन म्हणाल्या की, या चित्रपटामध्ये मानवी नातेसंबंध एका काळाच्या प्रवासासोबत उलगडण्यात आलेले आहेत. एनएफडीसीचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदुम म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमांमधील विशेष सादरीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण प्रतिबिंबित होत आहे. एक कल्पनारम्य कथा आणि भावनिक खोली असलेला ‘अच्चप्पास् अल्बम’ सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करण्याची क्षमता असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या एनएफडीसीच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. हा ट्रेलर तुम्ही https://www.youtube.com/watch?v=G6WDgZNA5u8 या संकेतस्थळावरही पाहू शकता.

Continue reading

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...
Skip to content