Homeब्लॅक अँड व्हाईटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळः देवांश, नीलसह सरदाना विजयी

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षांखालील शालेय बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकर, नील भट, रेयांश जैन यांनी अपराजित राहून सर्वाधिक ५ साखळी गुणासह निर्विवाद विजेतेपद पटकाविले. सरदाना मिरी, शानया दोशी, आस्या चव्हाण यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धीबळ संघटना सहकार्यित स्पर्धेप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व बुद्धीबळपटूंच्यावतीने विशेष गौरव कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षांखालील बुद्धीबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकरने (५ गुण) प्रथम, वेद मीलनने (४.५ गुण) द्वितीय, विराज बदानीने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये सरदाना मिरीने (३ गुण) प्रथम, समीरा थोरातने (३ गुण) द्वितीय, जिवी गालाने (२.५ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. १० वर्षांखालील मुलांमध्ये नील भटने (५ गुण) प्रथम, रेयांश  त्रिवेदीने (४ गुण) द्वितीय, आशय महाजनने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये शानया दोशीने (३ गुण) प्रथम, शरण्या महेश्वरीने (३ गुण) द्वितीय, वेदा फुरीयाने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. १२ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रेयांश जैनने (५ गुण) प्रथम, वेदांत मगरेने (३.५ गुण) द्वितीय, दीप फुणगेने (३.५ गुण ) तृतीय आणि मुलींमध्ये आस्या चव्हाणने (३.५ गुण) प्रथम पुरस्कार जिंकला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content