Homeटॉप स्टोरीमोफत लसीसाठी मुंबई...

मोफत लसीसाठी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना फक्त ३ संधी!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या ३ संधी मिळतील. या तीनही वेळेस कर्मचारी लसीकरण करण्यासाठी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येईल. महापालिकेच्या प्रशासनाने तसा निर्णय काल जाहीर केला.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’साठी कोविड लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांच्या व खात्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सर्व विभाग व खातेप्रमुखांना दिले आहेत. सर्व खातेप्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वतः लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असेही काकाणी यांनी नमूद केले आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड लसीकरण विषय बाबींसाठी गठित ‘टास्क फोर्स’ची विशेष बैठक काल झाली. या बैठकीला पालिकेचे उपायुक्त (आरोग्य) देवीदास क्षीरसागर, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. यानुसार प्रत्येक विभाग / खात्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभाग / खात्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण योग्यप्रकारे व्हावे, यासाठी सुयोग्य नियोजन करावयाचे आहे.

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करताना शक्यतो कार्यालयाजवळील किंवा घराजवळील लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करवून घेण्याची व्यवस्था समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील कर्मचाऱ्यांचे सॉफ्टवेअरमध्ये नोंदविलेले भ्रमणध्वनी क्रमांक योग्य असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक बदलले असतील, त्यांच्याबाबत सुधारित भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद करवून घ्यावयाची आहे.

कर्मचारी संख्या अधिक असलेल्या खात्यांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण राबविले जाऊ शकते. यासाठी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांनी व समन्वय अधिकाऱ्यांनी यथोचित समन्वय साधून कार्यवाही करावी. एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाचवेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक ते नियोजन खात्याच्या समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना कोविड बाधा झाली होती किंवा झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दिनांकपासून १४ दिवसानंतर लसीकरण करवून घ्यावयाचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरे लसीकरण करावयाचे आहे. शक्य असल्यास खातेप्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा ‘व्हाट्सअप ग्रुप’ असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल, असे आदेश देण्यात आले आहेत.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content