Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या शहरी भागात...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. हे काम आज सकाळी १० वाजल्यापासून उद्या, गुरूवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहरातल्या ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असून काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

बाधित होणाऱ्या पाणीपुरवठ्याविषयीचा तपशील पुढीलप्रमाणे-

‘ए’ विभाग – पी. डिमेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ- दुपारी १.४० ते ४.०० वा. आणि रात्री ९.४० ते मध्यरात्री २.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

‘बी’ विभाग – उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री ८.३० ते १०.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

टँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोंटाड, खडक, इस्तायल मोहल्ला, धोबी मार्ग, शेरिफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इस्साजी, नृसिंहनाथ, जंजीकार, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. रोड), निशाणपाडा, मशिद बंदर. (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.४० ते सकाळी ६.१० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.०० ते सकाळी ६.३० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

नंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वाडीबंदर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ४.२० ते ५.३० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

रेल्वे (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.०० वा.) (बुधवारी, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

मुंबई बंदर परिक्षेत्र (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ४.४५ ते ५.५५ वा. आणि रात्री ११.४० ते मध्यरात्री १२.४५ वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

‘सी’ विभाग- बॅनियन स्ट्रीट, इस्माईल कर्टे रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.४५ ते सकाळी ६.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

‘ई’ विभाग- नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.०० ते सकाळी ६.३० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

डिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरूद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रस्ता (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.०० ते सकाळी ६.३० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे संकुल, शिवदास चापसी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.३५ ते ८.१५ वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ६.३० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.०० ते सकाळी ६.३० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोद मार्ग, दरगाह गली, बॅ. नाथ पै मार्ग, दिलीमा स्ट्रीट, रुग्णालय गल्ली, चर्च लेन, बेकर्स लेन, नवाब टँक पूल, गन पावडर मार्ग, नवा नगर, डॉकयार्ड रोड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी १२.२० ते २.५० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

हाथीबाग जागा, शेठ मोतिशाह गल्ली (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

मुंबई बंदर क्षेत्र (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ४.४५ ते ५.५५ वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

जे. जे. रुग्णालय (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

रामभाऊ भोगले मार्ग, फरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चंपी भिमजी मार्ग, ए. जी. पवार गल्ली, वीर तानाजी मालुसरे मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

पाणी

बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कंपाउंड, अँटलस मिल कंपाउंड, घोडपदेव क्षेत्र (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५ वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

शिवदास चापशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री ८.०० ते १०.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

दारूखाना, लाकूड बंदर, कोळसा बंदर, दरगाह गली, क्वे स्ट्रीट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.३० ते रात्री ९.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

कस्तुरबा रुग्णालय (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ९.०० वा. आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ९.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

नायर रुग्णालय (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ९.०० वा. आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ९.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

‘एफ दक्षिण’ विभाग- अभ्युदय नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – मध्यरात्री २.१५ ते सकाळी ६.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

शिवडी, वडाळा (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.३० ते १०.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.३० ते १०.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ७.०० ते १०.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इन्स्टिट्यूट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ७.०० ते १०.०० वा.) (गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (काही भागात) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ४.३० ते ७.०० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ७.०० ते रात्री ९.३० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

मुंबई बंदर परिक्षेत्र (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.०० ते रात्री ८.३० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

परशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री ८.३० ते ११.३० वा.) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) (बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा)

संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content