Homeचिट चॅटमीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.

या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व पैलवानांचे विशेष अभिनंदन केले.

Continue reading

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...

शिवसेना- शिवसेना (उबाठा)च्या वादात मीडिया ट्रायल सुरू!

अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री...
Skip to content