Homeटॉप स्टोरीरेमडेसिविरनंतर आता ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ची...

रेमडेसिविरनंतर आता ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ची कमतरता?

कोरोनावरील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर, या इंजेक्शनच्या भरमसाठ मागणीनंतर आता कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसीस, या डोळ्यांच्या आजारावर परिणामकारक मारा करणाऱ्या अ‍ॅम्फोटेरिसिन बी, या औषधाची चणचण भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय रसायन मंत्रालयाने या औषधाच्या वाढीव मागणीची दखल घेत काल यावर चर्चा केली आणि या औषधाचा तुटवडा टाळण्यासाठी उत्पादनवाढ तसेच आयातीवर विचार करण्यात आला. देशातील काही राज्यांमध्ये, अ‍ॅम्फोटेरिसिन बी, या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे. हे औषध डॉक्टरांद्वारे रुग्णांना कोविडपश्चात म्युकरमायकोसीस या  गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना घेण्यास सांगितले केले जात आहे. यामुळे केंद्र सरकार या औषध उत्पादकांसोबत त्याचे उत्पादन  वाढवण्यासाठी  बोलणी करीत आहे. या औषधाची अतिरिक्त आयात करून तसेच स्थानिक उत्पादनात वाढ करत पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे रसायन मंत्रालयाकडून काल सांगण्यात आले.

उत्पादक / आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि 11 मे 2021 रोजी औषध विभागातील अ‍ॅम्फोटेरिसिन बी, या औषधाच्या मागणीचा तपशील पाहिल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे, 2021पर्यंत उपलब्ध केले जाईल.

केंद्र सरकारने सरकारी, खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना केली आहे. या वाटपातील औषध मिळविण्यासाठी खाजगी आणि  शासकीय रुग्णालयांशी संपर्क साधून त्याच्या आवश्यकतेचा तपशील रुग्णांच्या सोयीसाठी जाहीर करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.

याव्यतिरीक्त  यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण (नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी, एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content